शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Assembly Election: दक्षिणेत बिग फाइट; ५,१०२ उमेदवारी अर्ज, ३,६००हून अधिक उमेदवार उतरले रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 06:54 IST

Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत (२० एप्रिल) ३६०० हून अधिक उमेदवारांनी एकूण ५१०२ उमेदवारी अर्ज दाखल केले, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी येथे दिली.

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत (२० एप्रिल) ३६०० हून अधिक उमेदवारांनी एकूण ५१०२ उमेदवारी अर्ज दाखल केले, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी येथे दिली. 

१३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. एकूण ४७१० नामांकनांपैकी अर्ज ३३२७ पुरुष उमेदवारांनी, तर ३९१ अर्ज ३०४ महिला उमेदवारांनी दाखल केले आहेत. एक अर्ज तृतीयपंथीयाने दाखल केला आहे. गुरुवारी, सहाव्या आणि शेवटच्या दिवशी अनेक दिग्गज नेत्यांसह १६९१ उमेदवारांनी १९३४ उमेदवारी अर्ज दाखल केले.

भाजपकडून भ्रष्टाचाराचे समर्थन : काँग्रेसनरेंद्र मोदी कर्नाटकचे माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्याशी फोनवरून बोलल्यानंतर काँग्रेसने भाजपवर भ्रष्टाचाराचे समर्थन केल्याचा आरोप केला. निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतरही बंडखोरी न केल्याबद्दल पंतप्रधानांनी ईश्वरप्पांचे अभिनंदन करणे हे स्वीकारार्ह नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.

माजी मंत्री ईश्वरप्पांना पंतप्रधानांचा फोन - आपल्या मुलाला उमेदवारी न देताही भाजपच्या विजयासाठी प्रयत्न करत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांचे कौतुक केले.- तुमच्या पक्षाप्रतिच्या बांधिलकीने मी प्रभावित झालो आहे, असे मोदी त्यांना म्हणाले. - राजकारणातून निवृत्तीची घोषणा करणाऱ्या ईश्वरप्पा यांनी व्हिडीओ शेअर केला असून, यात ते मोदींशी फोनवर बोलताना दिसत आहेत. पंतप्रधानांना असे म्हणताना ऐकू येते की, ‘तुम्ही पक्षाप्रतिची बांधिलकी दाखवून दिली. म्हणून मी तुमच्याशी बोलायचे ठरवले. मी जेव्हा कर्नाटकात येईन, तेव्हा तुम्हाला नक्कीच भेटेन.’ 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस