शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Karnataka Assembly election 2023 Result: सीमा भागातील ५ जिल्हे, २८ मतदारसंघ; बेळगावातील 'या' लढतींकडे महाराष्ट्राचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 08:06 IST

Karnataka Assembly election 2023 Result: बेळगावसह सीमाभागातील ५ जिल्ह्यातील निकालांकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

मुंबई - महाराष्ट्राचा शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमावाद सुरू असून काही महिन्यांपूर्वीच हा वाद देशपातळीवर चर्चेत होता. मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्र सरकारनेही या काही महत्त्वाचे निर्णय त्यावेळी घेतले. त्यामुळे, सीमाभागातील मतदारसंघांकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यातच, महाराष्ट्र एकीकरण समितीसोबत आपण राहिले पाहिजे, असा सूर शिवसेनेनसह काही नेत्यांनी घेतला होता. त्यामुळे, बेळगावसह सीमाभागातील ५ जिल्ह्यातील निकालांकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

सीमाभागातील बेळगाव, विजयपूर (विजापूर) जिल्हा, कलबुर्गी (गुलबर्गा) जिल्हा, बिदर जिल्हा आणि बागलकोट या ५ जिल्ह्यातील २८ मतदारसंघांच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांच्या सीमाभागांतील या लढती आहेत. या लढतीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवारही निवडणुकांच्या रिंगणात आहेत. बेळगाव जिल्ह्यात चुरशीने झालेल्या मतदानाची मोजणी शनिवारी (दि. १३) होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत आहेत. दुपारपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

बेळगाव जिल्हा : निपाणी, चिक्कोडी-सदलगा, कागवाड, अथणी, यमकनमर्डी, बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण, खानापूर, गोकाक, हुक्केरी.

विजयपूर (विजापूर) जिल्हा : विजयपूर शहर, इंडी, सिंदगी, बबलेश्वर.

कलबुर्गी (गुलबर्गा) जिल्हा : अफजलपूर, आळंद, चिंचोली, कलबुर्गी ग्रामीण, कलबुर्गी दक्षिण, कलबुर्गी उत्तर.

बिदर जिल्हा : बसवकल्याण, बिदर, भालकी, औराद

बागलकोट जिल्हा : मुधोळ, जमखंडी, बागलकोट

या सर्व मतदारसंघांत मराठी भाषिक मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे, महाराष्ट्राचे लक्ष या लढतींकडे लागले असून येथे मराठी उमेदवारांना मतदारासांची पसंती मिळाली का हे निकालानंतरच स्पष्ट होईल. 

बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख लढती

१) निपाणी : शशिकला ज्वोल्ले (भाजप), काकासाहेब पाटील (काँग्रेस), उत्तम पाटील (राष्ट्रवादी)२) हुक्केरी : निखिल कत्ती (भाजप), ए. बी. पाटील (काँग्रेस)३) खानापूर : डॉ. अंजली निंबाळकर (काँग्रेस), मुरलीधर पाटील (महाराष्ट्र एकीकरण समिती), विठ्ठल हलगेकर (भाजप), नासिर बागवान (जनता दल -धर्मनिरपेक्ष)४) बेळगाव दक्षिण : रमाकांत कोंडूसकर (महाराष्ट्र एकीकरण समिती), अभय पाटील (भाजप), प्रभावती मास्तमर्डी (काँग्रेस)५) बेळगाव उत्तर : असिफ सेठ (काँग्रेस), डॉ. रवी पाटील (भाजप), अमर येळ्ळूरकर (महाराष्ट्र एकीकरण समिती)६) बेळगाव ग्रामीण : लक्ष्मी हेब्बाळकर (काँग्रेस), नागेश मन्नोळकर (भाजप), आर. एम. चौगुले (महाराष्ट्र एकीकरण समिती)७) यमकनमर्डी : सतीश जारकीहोळी (काँग्रेस), बसवराज हुंदरी (भाजप), मारुती अष्टगी (जनता दल- धर्मनिरपेक्ष)८) गोकाक : रमेश जारकीहोळी (भाजप), डॉ. महांतेश कडाडी (काँग्रेस)९) चिक्कोडी-सदलगा : गणेश हुक्केरी (काँग्रेस), रमेश कत्ती ( भाजप)१०) अथणी : लक्ष्मण सवदी (काँग्रेस), महेश कुमठळ्ळी (भाजप)११) कागवाड : श्रीमंत पाटील (भाजप), राजू कागे (काँग्रेस

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकPoliticsराजकारणbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूर