शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Assembly Election 2018- बदामी आणि चामुंडेश्वरी दोन्ही जागांवर जिंकण्याचा सिद्धरामय्यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 14:28 IST

हुबळी- कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दिवसेंदिवस प्रचाराला वेग येत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांच्या म्हैसूर जिल्ह्यातील चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघातून तसेच बागलकोट जिल्ह्यातील बदामी येथून निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही जागांवरुन आपण विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 12 मे रोजी कर्नाटकमध्ये मतदान होत असून सर्व जागांवर एकाच दिवसात मतदान होणार ...

हुबळी- कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दिवसेंदिवस प्रचाराला वेग येत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांच्या म्हैसूर जिल्ह्यातील चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघातून तसेच बागलकोट जिल्ह्यातील बदामी येथून निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही जागांवरुन आपण विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 12 मे रोजी कर्नाटकमध्ये मतदान होत असून सर्व जागांवर एकाच दिवसात मतदान होणार आहे.बदामी येथे निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी जात असताना हुबळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या यांनी आपण दोन्ही जागांवरुन निवडून येऊ अशी खात्री व्यक्त केली. तसेच आपला मुलगा डॉ. यतींद्र वरुणा मतदारसंघातून 50 हजार मताधिक्याने निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षात लोकांनी काँग्रेसने चालवलेलं उत्तम प्रशासन पाहिलं आहे, त्यामुळे काँग्रेसच पुन्हा सत्तेत येईल असं त्यांनी सांगितलं. बदामी आणि चामुंडेश्वरी या दोन्ही मतदारसंघात सकारात्मक वातावरण असल्याचंही त्यांनी मत व्यक्त केलं. मैसूरमधील चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघात सिद्धरामय्या यांना मोठे आव्हान जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवाराचे आहे. ही व्यक्ती म्हणजे त्यांचेच एकेकाळचे सहकारी जी. टी  देवेगौडा. यामुळे सिद्धरामय्या यांना काँग्रेसच्या इतर जागांवरील प्रचारापेक्षा आपल्या मतदारसंघासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आहे. याचा परिणाम निकालांवर दिसून येईल असा अंदाज निवडणूक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेस