शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Karnatak : काँग्रेस-जेडीएसमध्ये मंत्रिपदांनंतर व्हीआयपी जागांवरून रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 22:37 IST

कर्नाटकमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर आता काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरमध्ये वेगळ्याच कारणावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.

बंगळुरू - कर्नाटकमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर आता काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरमध्ये वेगळ्याच कारणावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. कर्नाटकमध्ये नव्या सरकारचा शपथविधी बुधवारी होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात उपस्थितासांठी ठेवण्यात येणाऱ्या व्हीआयपी आसनांमध्ये अधिकाधिक वाटा मिळवण्यासाठी काँग्रेस आणि  जनता दल सेक्युलरमध्ये रस्सीखेच रंगली आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील सत्तेतील भागीदारीबरोबरच शपथविधी सोहळ्यात ठेवण्यात येणाऱ्या सहा हजार व्हीआयपी आसनांसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या आसनांपैकी समाधानकारक आसने मिळण्याबाबत काँग्रेस चिंतीत आहे. काँग्रेसचे राज्यातील नेते जनता दल सेक्युलरच्या कार्यपद्धतीबाबत जाणून आहेत. त्यामुळे जनता दल सेक्युलर आपल्या नेत्यांसाठी अधिकाधिक आसने बळकावणार तर नाही ना, अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. तसेच कर्नाटक विधानसौधच्या परिसरात जेडीएसकडून असे पोस्टर लावण्यात आले आहेत. दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांच्यात सुरू असलेल्या सत्तास्थापनेबाबतच्या वाटाघाटी संपुष्टात आल्या असून, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसचे दलित नेते जी. परमेश्वर यांचे नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. ही माहिती कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलरचे नेते एच.डी कुमारस्वामी यांनी दिली. 

टॅग्स :congressकाँग्रेसKarnatakकर्नाटक