शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार नेमका कसा?; रस्ते शांत; हुबळीत घरोघरी प्रचारावर जोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 09:17 IST

भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या हुबळी मतदारसंघात दुपारच्या वेळेत फेरफटका मारला असता सारे काही शांत-शांत असल्याचे जाणवले

चंद्रकांत कित्तुरेहुबळी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी धारवाड जिल्ह्यातील सातही मतदारसंघांत सर्वच पक्षांनी प्रचाराचा धूमधडाका लावला असला रस्त्यांवर मात्र निवडणुकीचे कसलेही वातावरण दिसत नाही. सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वृत्तपत्रांमधूनच निवडणुकीचे वातावरण तापले आहे.

भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या हुबळी मतदारसंघात दुपारच्या वेळेत फेरफटका मारला असता सारे काही शांत-शांत असल्याचे जाणवले. उमेदवारांच्या प्रचारार्थ फिरणारी वाहने नाहीत की रस्त्यांवर मोठ-मोठाले बॅनरही नाहीत. प्रचार कार्यालयात तेवढीच कार्यकर्त्यांची लगबग जाणवते. नाही म्हणायला प्रचारसभांना गर्दी असते. मात्र, ती उत्स्फूर्त असते की जमवलेली, हा संशोधनाचा विषय आहे.

९२ उमेदवार रिंगणातधारवाड जिल्ह्यातील सात मतदारसंघांत ९२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांतील सर्वाधिक चर्चेत आहेत माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर. भाजपने उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी भाजपलाच आव्हान दिले आहे. हुबळी-धारवाडमध्ये या मतदारसंघात त्यांची थेट लढत भाजपचे महेश टेंगिनकाई यांच्याशी होत आहे. हे दोन्ही उमेदवार भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेचे आहेत; यामुळे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते त्यांच्या विजयासाठी सभा घेत आहेत. 

घरोघरी भेटी, कोपरा सभांवर जोरकाही राजकीय कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता, आमचा आणि उमेदवारांचा मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर आहे.  कोपरा सभाही सुरू आहेत. त्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस