शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

माजी उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला ‘चॅलेंज’; अथणीत लक्ष्मण सवदींचा शड्डू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 06:22 IST

१७ आमदारांना २०२३ मधील उमेदवारी द्यायचा वायदा भाजपने केला होता. त्यानुसार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या कुमठळ्ळी यांना यावेळी उमेदवारी देण्यात आली.

श्रीनिवास नागेअथणी (जि. बेळगाव) : अख्ख्या कर्नाटकातील भाजपच्या निशाण्यावर असलेल्या अथणी मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजपचे कमळ बाजूला सारून काँग्रेसचा ‘हात’ हातात घेऊन शड्डू ठोकला आहे. ‘हिंमत असेल तर मला पाडून दाखवा’ असे आव्हान त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिले आहे. त्यामुळे भाजपचे आमदार महेश कुमठळ्ळी यांच्याशी त्यांची काट्याची लढत होत आहे.

संपूर्ण कर्नाटक राज्याला नेत्यांचे पक्षांतर नवीन नाही. २०१८ मधील विधानसभा निवडणुकीत महेश कुमठळ्ळी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर तेव्हाच्या भाजपचे उमेदवार लक्ष्मण सवदी यांना केवळ २००० मतांनी अस्मान दाखविले होते. त्यानंतर भाजपने काँग्रेसच्या १७ आमदारांना फोडले. 

त्याचवेळी या १७ आमदारांना २०२३ मधील उमेदवारी द्यायचा वायदा भाजपने केला होता. त्यानुसार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या कुमठळ्ळी यांना यावेळी उमेदवारी देण्यात आली. त्यासाठी माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. या दरम्यान २०१८ मधील पराभवानंतर सवदी यांना भाजपने विधान परिषदेवर पाठविले होते, परंतु ते आता विधानसभेची उमेदवारी मागत होते. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर सवदींनी काँग्रेस गाठून तिकीट मिळवले. भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याने संपूर्ण राज्यातील पक्षाच्या नेत्यांनी अथणी मतदारसंघ लक्ष्य केला आहे.

पाण्याचे राजकारणबेळगाव जिल्ह्याचे राजकारण जेथे शिजते, त्या अथणी मतदारसंघातील सिंचनाअभावी कोरडा राहिलेला भाग ४० टक्के आहे. महाराष्ट्रातून आलेल्या कृष्णा नदीचे पात्र फेब्रुवारी ते मे यादरम्यान कोरडे पडलेलेे असते तेव्हा कोयना धरणातून चार टीएमसी कर्नाटकसाठी सोडावे, त्यासाठी लागणारी रक्कम भरण्याची तयारी आहे, असे कर्नाटक सांगते. दुसरीकडे कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून महाराष्ट्रातील जतच्या पूर्व भागाला पाणी द्यावे, असा प्रस्ताव आहे, मात्र त्यावर कार्यवाही झालेली नाही. परिणामी दरवर्षी अथणी तालुक्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होतो.

जिल्हा विभाजनाचे भिजत घोंगडेबेळगाव जिल्ह्यात विधानसभेचे १८ मतदारसंघ आहेत. जिल्हा विस्ताराने खूप मोठा आहे. अथणीपासून बेळगावचे अंतर दीडशे किलोमीटर आहे. त्यामुळे अथणी मतदारसंघाचे जवळच्या सांगलीशी बाजारपेठ, पै-पाहुणे या माध्यमातून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी आहे. परंतु राजकारणात हे घोंगडे भिजत पडले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने तो मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक