कळमेश्वर... जोड
By Admin | Updated: February 18, 2015 23:53 IST2015-02-18T23:53:44+5:302015-02-18T23:53:44+5:30
शेतकऱ्यांनी खायचे काय?

कळमेश्वर... जोड
श तकऱ्यांनी खायचे काय?शासनाने जमीन अधिग्रहित केल्यानंतर अद्यापही मोबदला दिला नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेशा प्रमाणात उत्पादन मिळत नाही. सतत नापिकीला सामोरे जावे लागत आहे. शिवाय जमिनीच्या विक्रीवरही बंदी घातल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खायचे काय असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत. या परिसरातील गावांमध्ये आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. असे असताना वेकोलि प्रशासन शेतकऱ्यांच्या मोबदलाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पुन्हा किती शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागेल, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. वेकोलि प्रशासनाने या समस्येवर तत्काळ तोडगा न काढल्यास आंदोलन पुकारण्याचा इशाराही काहींनी दिला आहे. ..... कोट....ही बाब माझ्या अधिकारात येत नसल्याने तहसील कार्यालयाकडून बोरगाव व आदासा येथील जमीन भूसंपादन प्रकरणावर तोडगा काढू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा.- गणपत पुरकेतहसीलदार, तहसील कार्यालय, कळमेश्वर