करिष्माने पैशांसाठी माझ्याबरोबर लग्न केले - संजय कपूर

By Admin | Updated: January 15, 2016 13:33 IST2016-01-15T11:05:24+5:302016-01-15T13:33:13+5:30

करिष्मा कपूरने पैशांसाठी माझ्या बरोबर लग्न केले. करिष्माने पैशांसाठी आणि ऐशोआरामी आयुष्य जगता यावे यासाठी माझ्याबरोबर लग्न केले असा दावा संजय कपूरने केला आहे.

Karisma married me for money - Sanjay Kapoor | करिष्माने पैशांसाठी माझ्याबरोबर लग्न केले - संजय कपूर

करिष्माने पैशांसाठी माझ्याबरोबर लग्न केले - संजय कपूर

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १५ -  करिष्मा कपूरने पैशांसाठी माझ्या बरोबर लग्न केले. करिष्माने पैशांसाठी आणि ऐशोआरामी आयुष्य जगता यावे यासाठी माझ्याबरोबर लग्न केले असा दावा संजय कपूरने बांद्रा कौटुंबिक न्यायालयात नव्याने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेत केला आहे. 
अभिषेक बच्चनबरोबर प्रेम प्रकरण संपुष्टात आल्यानंतर करिष्माने २००३ मध्ये दिल्ली स्थित व्यावसायिक संजय कपूर बरोबर विवाह केला होता. संजयने दाखल केलेल्या याचिकेमध्ये ११ वर्षांचा वैवाहिक नाते संपुष्टात येण्यासाठी करिष्माला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. 
पत्नी, सून म्हणूनचे नव्हे तर, आई म्हणूनही करिष्मा अपयशी ठरल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. करिष्मा आमच्या मुलांचा मोहोरया सारखा वापर करते आणि आम्हाला मुलांना भेटू देत नाही असा आरोप संजय कपूरने केला आहे. 
करिष्माला मी दिल्लीत येऊन माझ्यासोबत रहाण्यास सांगितले पण तिने माझ्याऐवजी तिच्या करीयरला प्राधान्य दिले आणि आज ती मुंबईत रहात आहे असे संजयने याचिकेत म्हटले आहे. 
 

Web Title: Karisma married me for money - Sanjay Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.