शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"तेव्हा मोदी 105 वर्षांचा असेल, आज शिव्या का खाईल?" अग्निपथ योजनेवरून पंतप्रधानांनी विरोधकांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:50 IST

"...मोदी असा राजकारणी आहे का जो आज शिव्या खाईल? काय तर्क देत आहेत."

कारगिल विजय दिनानिमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज द्रासला भेट दिली. यावेळी त्यांनी अग्निपथ योजनेवरही मोकळेपणाने भाष्य केले. ते म्हणाले, "या योजनेच्या बाबतीत काही लोकांनी देशातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याच वेळी त्यांनी विरोधीपक्षांवर हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करून देशाच्या लष्कराला कमकुवत करण्याचा आरोपही केला. ते म्हणाले, अग्निपथ योजनेचे उद्देश देशाचे लष्कर तरुण करणे आहे.

पेन्शनच्या नावाने निर्माण केला संभ्रम -अग्निपथ योजनेसंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "प्रायव्हेट सेक्टर आणि पॅरामिलिट्री फोर्सेसमध्ये अग्निवीरांना प्राधान्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मला आश्चर्य वाटते की, काही लोकांच्या विचारांना काय झाले आहे? सरकारने पेन्शनचे पैसे वाचवण्यासाठी ही योजना आणली असल्याचा संभ्रम ते निर्माण करत आहेत.

तेव्हा तर मोदी 105 वर्षांचा असेल -मोदी म्हणाले, "अशा लोकांच्या विचारांची मला किळस वाटते. मात्र अशा लोकांना मला विचारायचे आहे की, मोदीच्या सत्ताकाळात ज्यांची भरती होणार आहे, त्यांना आजच पेन्शन द्यायची आहे का? त्यांना 30 वर्षांनंतर पेन्शन द्यावी लागणार आहे. तेव्हा तर मोदी 105 वर्षांचा असेल. जेव्हा मोदी 105 वर्षांचा असेल, 30 वर्षांनंतर जी पेन्शन वाचेल, तर मोदी असा राजकारणी आहे का जो आज शिव्या खाईल? काय तर्क देत आहेत."

मोदी म्हणाले, "ज्याप्रमाणे मी यापूर्वी म्हटले आहे, आम्ही राजकारणासाठी नाही, तर राष्ट्रकारणासाठी काम करत आहोत. आमच्यासाठी देशाची सुरक्षितता सर्वोपरी आहे. आमच्यासाठी 140 कोटी लोकांची शांतता सर्वप्रथम आहे. जे लोक देशातील तरुणांची दिशाभूल करत आहेत, इतिहास साक्षी आहे, त्यांना सैनिकांची कसलीही परवा नाही. हे तोच लोक आहे, जे 500 कोटी रुपयांची नाममात्र रक्कम दाखवून वन रँक वन पेन्शनवर खोटे बोलत होते. मात्र, आमच्या सरकारने वन रँक वन पेन्शन लागू केली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKargil Vijay Diwasकारगिल विजय दिनBJPभाजपाSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान