शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 05:53 IST

कारगिल विजयदिनी वीर मातेने दिला संदेश

लामोचेन (कारगील) : १९९९च्या कारगील युद्धात वयाच्या २०व्या वर्षी विनोद कंवरच्या पतीला हौतात्म्य प्राप्त झाले. दोघांच्या पोटी आलेला एक मुलगा आता मोठा झाला आहे. हा तेजवीरसिंह राठोडही लष्करात दाखल झाला असून त्याला या वीरमातेनेही प्रोत्साहन दिले. ही माता म्हणते, ‘आपण स्वार्थी होऊ शकत नाहीत. अगोदर राष्ट्राचाच विचार आणि देशाचे संरक्षण महत्त्वाचे आहे.’ तेजवीर याचे पिता नायक भंवरसिंह राठोड १० जुलै १९९९ रोजी पॉईंट ४७०० वर यशस्वीरीत्या पुन्हा ताबा मिळवताना देशासाठी शहीद झाले होते. आज विनोद कंवर यांचे वय ४६ वर्षांचे आहे. 

तेव्हा एक वर्ष वय...१० जुलै १९९९ रोजी पिता भंवरसिंह शहीद झाले तेव्हा तेजवीरचे वय अवघे सहा महिन्याचे होते. त्याने पित्याला पाहिलेलेही नाही. तो मोठा होईल तसे त्याला लष्कराचे आकर्षण वाटू लागले. मग आईनेही प्रोत्साहन दिले आणि एका शहीद जवानाचा पुत्र आता लष्करात दाखल झाला आहे. डेहराडूनमध्ये भारतीय सैन्य अकादमीत सध्या त्याचे प्रशिक्षण सुरू असून लवकरच तो पूर्ण वेळ लष्करात दाखल होईल.

कंवरची तिसरी पिढीविनोद कंवर सांगतात, ‘देशासाठी सेवा देणारी तेजवीरच्या रुपाने आमची ही तिसरी पिढी आहे. माझे वडीलही सैनिक होते. पतीने देशासाठी बलिदान दिले. आता मुलगाही देशाची सेवा करेल.’युद्धात काय घडले होते?कारगिल भागात पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी केलेल्या घुसखोरीनंतर भारतीय लष्कराने या अत्यंत आव्हानात्मक अशा बर्फाळ पर्वत भागांत शत्रूला हुसकावून लावण्यासाठी मोहीम सुरू केली. जवळपास तीन महिने ही मोहीम सुरू होती. २६ जुलै १९९९ रोजी हे ‘ऑपरेशन विजय’ यशस्वीरीत्या पूर्ण झाले होते. नायक भंवरसिंह यांनी या कारवाईदरम्यान बलिदान दिले होते.‘ड्रोन शो’ने वेधले लक्षकारगिल विजय दिनानिमित्त लष्कराने द्रास भागात आयोजित केलेल्या ड्रोन शोमध्ये भारतीय तंत्रज्ञानाच्या विकासाचे आधुनिक रूप पहावयास मिळाले. या ड्रोनने अनेक क्षमतांचे दर्शन घडवले. सुमारे ४ हजार मीटर उंचीवर हे ड्रोन सहजपणे ऑपरेट होऊ शकतात. या ड्रोन शोमध्ये रोबोटिक श्वानही सहभागी होते. यांचा वापर अत्यंत दुर्गम भागांत स्फोटके शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. याने लडाखसारख्या दुर्गम भागांत वातावरणाचे आव्हान असताना सैनिकांना असलेला धोका कमी करता येणार आहे. १९९९मध्ये शत्रूच्या घुसखोरीनंतर भारतीय लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट हे ड्रोन म्हणजे एक उडते सुरक्षा कवच ठरणार आहे.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनIndiaभारतIndian Armyभारतीय जवान