शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

Kargil Vijay Diwas: पाकचं ऑपरेशन बद्र हाणून पाडत भारतानं राबवलं ऑपरेशन विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 14:23 IST

पाकच्या कुरापतींमुळे या दोन्ही देशांमधील मैत्री कधी पुढे गेलीच नाही.

भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारील देशांमधील छत्तीसचा आकडा जगजाहीर आहे. भारताने पाकिस्तानबाबत अनेकदा नरमाईची भूमिका घेतली. पण पाकच्या कुरापतींमुळे या दोन्ही देशांमधील मैत्री कधी पुढे गेलीच नाही. उलट, काश्मीरवर पाकिस्तानने हक्क दाखवला कायम ठेवलं. तसेच नियंत्रण रेषेवर नापाक कारवाया करणं यामुळे भारत-पाकमधील तणाव वाढतच चाललाय. त्याच पार्श्वभूमीवर 'पाकला पुन्हा एकदा कारगिलसारखा दणका द्यायला हवा', अशी इच्छा अनेक जण व्यक्त करतात. त्याच अनुषंगाने, कारगिल विजय दिवसाच्या (26 जुलै) निमित्तानं या युद्धाचा इतिहास आणि कारणं जाणून घेऊ या. 

भारत-पाकिस्तानमध्ये 1971मध्ये झालेलं दुसरं युद्धही भारतानं जिंकलं होतं. पण दोनदा हिसका दाखवूनही पाकिस्तानचं शेपूट वाकडंच आहे. उलट हे पराभव त्यांच्या इतके जिव्हारी लागलेत की, भारताला अस्थिर करण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. पण भारतीय लष्कराच्या जिगरबाज जवानांनी आतापर्यंत त्यांचे सगळे कट उधळून लावलेत. त्यापैकी सगळ्यात मोठा कट होता, तो म्हणजे 'ऑपरेशन बद्र'. अणुचाचणीच्या मुद्द्यावरून भारत-पाकमधील संबंध टोकाला गेले होते. हे वातावरण निवळावं, सीमांवर शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून दोन्ही देशांनी फेब्रुवारी 1999मध्ये लाहोर इथे करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार काश्मीर प्रश्नावर द्विपक्षीय चर्चा करून शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. परंतु 'हम नही सुधरेंगे' वृत्तीच्या पाकिस्तानने कुरापती सुरूच ठेवल्या. लष्कराच्या आणि निमलष्करी दलाच्या सैनिकांना आणि त्यांच्या आडून दहशतवाद्यांना लपूनछपून नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यास त्यांनी सुरुवात केली. हेच होतं, 'ऑपरेशन बद्र'. काश्मीर आणि लडाखला जोडणारा मार्ग तोडून भारतीय जवानांना सियाचीनमधून हटवण्याचं कारस्थान त्यांनी रचलं होतं. कारण या भागात तणाव निर्माण झाल्यास काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल आणि भारतावर दबाव वाढवता येईल, असं पाकिस्तान समजत होता. 
सुरुवातीला ही घुसखोरी भासवण्यात आली. पण भारतीय जवान डोळ्यात तेल घालून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. नियंत्रण रेषेवर शोधमोहिमेदरम्यान पाकिस्तानचा कट उघड झाला. मोठा हल्ला करण्याच्या तयारीनं पाकने आपल्या सैनिकांनाच LoC पार पाठवलं असल्याचं बिंग फुटलं आणि भारताचे तब्बल 2 लाख जवान 'ऑपरेशन विजय' यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले. तब्बल 60 दिवस ते जिद्दीने लढले आणि जिंकले.  कारगिल हा भाग समुद्रसपाटीपासून 13 ते 18 हजार फूट उंचीवर आहे. तिथलं तापमान उणे 30 ते उणे 40 अंश सेल्सियस इतकं असतं. अशा वातावरणात आपले जिगरबाज जवान न डगमगता शत्रूशी मुकाबला करत होते. इतक्या उंचीवर कधीच कुठलंच युद्ध झालं नव्हतं. या युद्धात 26 जुलै 1999च्या दिवशी शेवटचा पाकिस्तानी सैनिक मारला गेला आणि भारतीय जवानांनी कारगिलवर अभिमानानं तिरंगा फडकवला. भारतीय लष्कराचे 543 अधिकारी आणि जवान या युद्धात शहीद झाले. आपण देशवासीयांनी सदैव त्यांचे ऋणी राहायला हवं.   

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनIndian Armyभारतीय जवान