गार्डने केली कच्च्या कैद्याची हत्या
By Admin | Updated: July 5, 2015 23:31 IST2015-07-05T23:31:12+5:302015-07-05T23:31:12+5:30
उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथील जिल्हा कारागृहात सुरक्षा गार्डनी केलेल्या अमानुष मारहाणीत एका कच्च्या कैद्याचा मृत्यू झाला.

गार्डने केली कच्च्या कैद्याची हत्या
जौनपूर : उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथील जिल्हा कारागृहात सुरक्षा गार्डनी केलेल्या अमानुष मारहाणीत एका कच्च्या कैद्याचा मृत्यू झाला. कैद्याच्या मृत्यूनंतर अन्य कैदी आणि कारागृह अधिकाऱ्यांमध्ये तुफान संघर्ष उडाला, ज्यात २६ जण जखमी झाले.
श्यामकुमार यादव असे मृत कैद्याचे नाव आहे. त्याने कारागृहातील एका महिला सुरक्षा गार्डची छेड काढल्याचा आरोप आहे. यादव आपली छेडखानी करीत असल्याचे या महिला गार्डने अन्य सहकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे अन्य गार्ड संतप्त झाले आणि त्यांनी शनिवारी यादवला पकडून बेदम मारहाण केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान यादवच्या मृत्यूमुळे अन्य कैदी संतप्त झाले आणि त्यांनी सुरक्षा गार्ड व अधिकाऱ्यांवर हल्ला केला. यावेळी तुफान संघर्ष उडाला, ज्यात ६ पोलिसांसह २६ जण जखमी झाले. कैद्यांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधूर, पाण्याचा मारा आणि रबरी गोळ्यांचाही वापर करावा लागला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. (वृत्तसंस्था)