शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याला आगीतून वाचवण्यासाठी कुशीत घेऊन धावला; शूरवीराचा फोटो पाहून तुम्हीही कराल 'कडक सॅल्युट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 15:51 IST

नुकतीच एक अशी घटना समोर आली आहे जी वाचून तुम्हीही त्या पोलिसाला नक्कीच कडक सॅल्युट कराल.

जनतेच्या संरक्षणासाठी पोलीस सदैव तत्पर असतात. नुकतीच एक अशी घटना समोर आली आहे जी वाचून तुम्हीही त्या पोलिसाला नक्कीच कडक सॅल्युट कराल. राजस्थानमध्ये (Rajasthan) नवसंवत्सर निमित्त काढण्यात आलेल्या बाईक रॅलीवर (Bike Rally) झालेल्या दगडफेकीनंतर जाळपोळीचे प्रकार घडले. शनिवारी या घटनेचे काही फोटो सोशल मीडियावर (Social Media) वर व्हायरल झाले. यातच एक असा फोटोही समोर आला जो पाहून लोकांनी पोलिसांच्या शूरपणाचं कौतुक केलं. 

दरम्यान, व्हायरल झालेल्या फोटोंपैकी हा फोटो राजस्थान पोलिसातील हवालदार नेत्रेश शर्मा यांचा आहे. फोटोमध्ये हवालदार नेत्रेश एका चिमुकल्याला आगीमधून वाचवून आपल्या कुशीत घेऊन सुरक्षित स्थळी नेताना दिसत आहेत. बाजारात खरेदीसाठी आलेल्या दोन महिला हिंसाचारानंतर झालेल्या जाळपोळीपासून बचाव करण्यासाठी जवळच्या घरात लपल्या. त्यावेळी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाल्याचं सांगण्यात येत आहे.

घरही चारही बाजूंनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यावर त्यांच्यासोबत असलेल्या महिला आणि लहान मूल रडायला लागले. मुलाचा आवाज ऐकून हवालदार नेत्रेश धावत आले आणि मुलाला आपल्या कुशीत घेऊन बाहेरच्या दिशेने धावले. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलाही त्यांच्या मागे धावल्या. यामुळे तिघांचेही प्राण बचावले.राजस्थान पोलिसांकडूनही कौतुकराजस्थान पोलिसांनीही ट्वीट करून आपल्या कॉन्स्टेबलच्या धैर्याला सलाम केला आहे. राजस्थान पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांचा फोटोही शेअर केला आहे. करौली येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं.नेत्रेश यांनी सांगितला संपूर्ण प्रकार"मी सिग्मा गाडीवर तैनात होतो. बाईक रॅली सकाळी साडेतीन वाजता रवाना झाली. ५ वाजता ती हटवाड्यात पोहोचली. मी २०० मीटर पुढे गणेश गेटवर होतो. हिंसाचाराची माहिती मिळताच मी घटनास्थळी पोहोचलो. त्या ठिकाणी आगही लागली होती. याचदरम्यान, त्या ठिकाणी आगीच्या भक्ष्यस्थानी गेलेलं घर पाहिलं. महिलांच्या रडण्याचाही आवाज येत होता आणि एका महिलेच्या कडेवर चार वर्षांचं बाळही होतं," असं नेत्रेश म्हणाले.

भीषण परिस्थितीत पाहता मी त्वरित निर्णय घेतला आणि सिग्मा गाडीतून उतरून धावत आगीच्या भक्ष्यस्थानी गेलेल्या घराकडे गेलो. त्या महिलांच्या चेहऱ्यावर जी भीती होती ती कधीही विसरता येणार नसल्याचंही ते म्हणाले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानSocial Mediaसोशल मीडिया