शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! करौली आश्रमात 1.5 लाखांचा होम करताच मुलगा बेपत्ता, दुसऱ्या दिवशी वडील गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 14:11 IST

कुटुंबीय आपल्या लहान मुलावर उपचार करण्यासाठी करौली आश्रमात आले होते, मात्र कुटुंबप्रमुख आणि आजारी मुलगा आश्रमातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घ़डली आहे. 

डॉक्टर सिद्धार्थ चौधरी यांना मारहाण केल्याच्या आरोपानंतर चर्चेत आलेले कानपूरचे करौली बाबा संतोष सिंह भदौरिया यांना आणखी एका आरोपाला सामोरे जावे लागले आहे. झारखंडमधून उपचारासाठी आलेल्या एका कुटुंबाने करौली आश्रमावरच आता सवाल उपस्थित केला आहे. कुटुंबीय आपल्या लहान मुलावर उपचार करण्यासाठी करौली आश्रमात आले होते, मात्र कुटुंबप्रमुख आणि आजारी मुलगा आश्रमातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घ़डली आहे. 

आरोपानुसार, झारखंडमधील देवघर येथील एक कुटुंब आपल्या मुलावर उपचार करण्यासाठी 24 जानेवारीला करौली आश्रमात आले होते. हे कुटुंब करौली शंकर महादेवाच्या दरबारात पोहोचले होते. करौली शंकर महादेव यांनी होम-हवन करण्याची सूचना केली होती. दीड लाख रुपयांचा होम करावा, असे आश्रमाच्या वतीने सांगण्यात आले. 25 जानेवारी रोजी कुटुंबाच्या वतीने दीड लाख रुपये खर्च करून होम करण्यात आला. 

होम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारीला आजारी मुलगा बेपत्ता झाला. तर त्यानंतर 27 जानेवारी रोजी कुटुंबप्रमुख अचानक गायब झाले. यानंतर कुटुंबीयांच्या वतीने दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले. जवळपास 10 दिवसांनंतर आश्रमापासून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात एक मानसिकरित्या आजारी मुलगा सापडला. कुटुंबीयांनी त्याला परत आणले, मात्र वडिलांचा ठावठिकाणा लागला नाही. यानंतर कुटुंबीयांनी 9 फेब्रुवारी रोजी कानपूरमधील विधनू पोलीस ठाण्यात व्यक्ती हरवल्याची तक्रार नोंदवली होती. दोन महिने झाले तरी वडील बेपत्ता आहेत.

कानपूरचे पोलीस अधिकारी म्हणाले की, आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत, आम्ही आवश्यक त्या सर्वांची चौकशी करू. करौली आश्रमाचे बाबा संतोष सिंह भदौरिया यांच्यावर त्यांच्याच भक्ताने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. बाबा संतोष सिंह भदोरिया यांचे भक्त सिद्धार्थ चौधरी म्हणाले की, "मी करौली बाबांचे व्हिडीओ यूट्यूबवर खूप बघायचो, त्यांच्यामुळे प्रभावित होऊन मी माझ्या वडील आणि पत्नीसोबत नोएडाहून त्यांच्या आश्रमात गेलो. पण त्यांनी मला बेदम मारहाण केली." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी