कराटे चॅम्पियन मुलीने छेड काढणाऱ्याला हवालदाराला फरफटत नेलं पोलीस स्टेशनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 11:19 AM2018-04-07T11:19:39+5:302018-04-07T11:19:39+5:30

कराटे चॅम्पियन असणाऱ्या एका तरूणीने तिची छेड काढणाऱ्या पोलीस हवालदाराला बेदम चोप दिला

karate champion neha jangra beats up cop who tries to molest | कराटे चॅम्पियन मुलीने छेड काढणाऱ्याला हवालदाराला फरफटत नेलं पोलीस स्टेशनमध्ये

कराटे चॅम्पियन मुलीने छेड काढणाऱ्याला हवालदाराला फरफटत नेलं पोलीस स्टेशनमध्ये

Next

चंदीगढ- हरियाणामध्ये राष्ट्रीय स्तरावर कराटे चॅम्पियन असणाऱ्या एका तरूणीने तिची छेड काढणाऱ्या पोलीस हवालदाराला बेदम चोप दिला. शेअरिंग ऑटो रिक्षामध्ये छेडछाड करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक केली आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. नेहा जांगडा असं तक्रार करणाऱ्या मुलीचं नाव असून तिने 10 व्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप 2017मध्ये हरियाणाचं प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक जिंकलं आहे. कराटे क्लास आटपून घरी जात असताना नेहा शेअरिंग रिक्षेमध्ये बसली. त्याचवेळी एक ट्रॅफिक पोलीस कर्मचारी त्याच रिक्षेत बसला व तिची छेड काढालया लागला. 

नेहाने एका वेबसाइटला दिलेल्या माहितीनुसार, तो पोलीस हवालदार जबरदस्तीने फोन नंबर मागू लागला. मी नंबर द्यायला नकार दिल्यावर तो मैत्री करण्याचं बोलू लागला. मी त्याला अनेकदा धमकावलं आणि रिक्षेच्या एका बाजूला धक्का दिला. आरोपी रिक्षेतून पळण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी रिक्षाचालकाने मला मदत केली. त्याला आम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये फरफटत नेलं. यानंतर नेहाचे वडीलही पोलीस स्टेशनला आले. आरोपीला अटक करून त्याच्यावर आयपीसीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: karate champion neha jangra beats up cop who tries to molest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.