पहिल्या सेक्ससाठी करण जोहरने दिले होते पैसे
By Admin | Updated: January 15, 2017 19:33 IST2017-01-15T18:29:19+5:302017-01-15T19:33:50+5:30
बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक करण जोहर याच्या आत्मचरित्रातून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.

पहिल्या सेक्ससाठी करण जोहरने दिले होते पैसे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.15, - बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक करण जोहर याच्या आत्मचरित्रातून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. स्वत:चे समलैंगिक संबंध, शाहरुखसोबतचे नाते यांच्या उल्लेखातून वाद निर्माण करणाऱ्या करण जोहरने आता आपल्या खाजगी आयुष्याबाबत अजून एक धक्कादायक खुलासा केला आहे. पहिला सेक्स करण्यासाठी आपण पैसे मोजले होते, असे करण जोहरने म्हटले आहे,
सुखवस्तू कुटुंबात वाढलेल्या करणला 26 व्या वर्षापर्यंत सेक्सचा अनुभव नव्हता. तसेच आपल्या मित्रांनाही सेक्सविषयी फार माहिती नव्हती. सेक्सबाबत बराच अनभिज्ञ असल्याने न्यूयॉर्कमध्ये दोन वेळा पैसे देऊन सेक्सचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला, त्यातील पहिल्या वेळेस घाबरल्यामुळे काहीच केले नाही, पण दुसऱ्या वेळेस मात्र आपली इच्छा अपूर्ण ठेवली नाही. असे करणने आपल्या पुस्तकात म्हटले आहे. मात्र असे केल्यानंतर मनात अपराधीपणाची भावना आल्याचेही करणने कबूल केले. तसेच काजोल आणि त्याच्या मैत्रित आलेल्या दुराव्याबाबतही करणने खुलासा केला आहे. काजोलचा पती अजय देवगणमुळे काजोल आणि आपणात दुरावा आल्याचा आरोप त्याने केलाय.