कर्म नीच असू शकतात जात नाही - राहुल गांधी

By Admin | Updated: May 7, 2014 10:16 IST2014-05-07T10:15:04+5:302014-05-07T10:16:02+5:30

माणसाचे कर्म नीच असू शकतात, जात कधीच नीच नसते अशा तिखट शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर पलटवार केला आहे.

Karam can not be humble - Rahul Gandhi | कर्म नीच असू शकतात जात नाही - राहुल गांधी

कर्म नीच असू शकतात जात नाही - राहुल गांधी

>ऑनलाइन टीम
अमेठी, दि. ७ - माणसाचे कर्म नीच असू शकतात, जात कधीच नीच नसते अशा तिखट शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर पलटवार केला आहे. मी खालच्या जातीचा असे सांगणा-या मोदींवर राहुल गांधींनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 
मंगळवारी प्रचारसभेत मोदींनी मी खालच्या जातीचा असल्याने माझा अपमान केला जातो असे सांगत जातीचे कार्ड खेळले होते. याविषयी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना यांनी बुधवारी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी म्हणाले, माणसाची विचारधारा नीच असू शकते, रागाची असू शकते पण जात कधीच नीच नसते. लोकशाहीच्या बळकटीकरणावर मी लक्ष केंद्रीत करणार असून सर्वांनी मतदान अवश्य करावे अशी आशाही त्यांनी वर्तवली. 

Web Title: Karam can not be humble - Rahul Gandhi