कन्याकुमारी-बंगळुरु एक्सप्रेसला अपघात, २० प्रवासी जखमी
By Admin | Updated: February 5, 2016 10:48 IST2016-02-05T09:04:01+5:302016-02-05T10:48:02+5:30
तामिळनाडूतील वेल्लोरे जिल्ह्यातील सोमानयाकानपट्टी आणि पाटचूर रेल्वे स्थानकांदरम्यान कन्याकुमारी-बंगळुरु एक्सप्रेस रुळावरुन घसरली.

कन्याकुमारी-बंगळुरु एक्सप्रेसला अपघात, २० प्रवासी जखमी
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ५ - तामिळनाडूतील वेल्लोरे जिल्ह्यातील सोमानयाकानपट्टी आणि पाटचूर रेल्वे स्थानकांदरम्यान कन्याकुमारी-बंगळुरु एक्सप्रेस रुळावरुन घसरली. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत वीस प्रवासी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती रेल्वेचे पीआरओ अनिल सक्सेना यांनी दिली.
या अपघातात एकूण ११ डब्यांचे नुकसान झाले. आठ डबे रुळावरुन घसरले तर, तीन डबे पलटी झाल्याची माहिती सक्सेना यांनी दिली. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
या अपघातामुळे चेन्नई-बंगळुरु मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दक्षिण रेल्वेने चेन्नई-बंगळुरु दरम्यान धावणा-या काही गाडया रद्द केल्या आहेत.