कन्हैय्या कुमारच्या अंगावर जखमा, वैद्यकीय अहवालात स्पष्ट

By Admin | Updated: February 19, 2016 18:07 IST2016-02-19T18:00:09+5:302016-02-19T18:07:06+5:30

कन्हैय्या कुमारवर पटियाला न्यायालय परिसरात झालेल्या हल्यात जखमा झाल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट झालं आहे

Kanya Ayesha's wounds, explained in the medical report | कन्हैय्या कुमारच्या अंगावर जखमा, वैद्यकीय अहवालात स्पष्ट

कन्हैय्या कुमारच्या अंगावर जखमा, वैद्यकीय अहवालात स्पष्ट

ऑनलाइन लोकमत -
 
नवी दिल्ली, दि. 19 - देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेला जवाहरलाल नेहरु विद्यापीठ संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारवर पटियाला न्यायालय परिसरात झालेल्या हल्यात जखमा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. वैद्यकीय अहवालात ही गोष्ट उघड झाली आहे. बुधवारी पटियाला न्यायालयात सुनावणीसाठी घेऊन जात असताना कन्हैय्या कुमारवर काही वकिलांनी हल्ला झाला होता. 
 
दिल्लीचे पोलीस आयुक्त बी एस बस्सी यांनी मात्र हे आऱोप फेटाळले आहेत. मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कन्हैय्या कुमारच्या डाव्या पायाला आणि नाकाला जखम झाल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. तसंच त्याच्या अंगठ्यालादेखील जखम झाली होती. 
 
दिल्लीचे पोलीस आयुक्त बी एस बस्सी यांनी सर्व आरोपांचं खंडन करत हल्ला झाल्याचा आरोप चुकीच असल्याचं बोलले आहेत. सध्या हे प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर जास्त बोलणे योग्य नसल्याचंही ते बोललेत. 

Web Title: Kanya Ayesha's wounds, explained in the medical report