पंजाब-राजस्थानदरम्यान धावते कॅन्सर एक्स्प्रेस; ट्रेनची ओळख पुसण्यासाठी ११ वर्षांपासून प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 03:39 AM2018-03-29T03:39:59+5:302018-03-29T03:39:59+5:30

पंजाबमध्ये बठिंडाहून राजस्थानच्या बिकानेरपर्यंत जाणारी रेल्वेगाडी कॅन्सर एक्स्प्रेस या नावाने ओळखली जाते.

Kansar Express run between Punjab and Rajasthan; Tried for 11 years to clear the identity of the train | पंजाब-राजस्थानदरम्यान धावते कॅन्सर एक्स्प्रेस; ट्रेनची ओळख पुसण्यासाठी ११ वर्षांपासून प्रयत्न

पंजाब-राजस्थानदरम्यान धावते कॅन्सर एक्स्प्रेस; ट्रेनची ओळख पुसण्यासाठी ११ वर्षांपासून प्रयत्न

Next

बलवंत तक्षक  
चंदीगड : पंजाबमध्ये बठिंडाहून राजस्थानच्या बिकानेरपर्यंत जाणारी रेल्वेगाडी कॅन्सर एक्स्प्रेस या नावाने ओळखली जाते. बिकानेरला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये बहुसंख्य कॅन्सरचे रुग्ण असतात. त्यामुळेच तिला हे नाव पडले आहे. बिकानेरमध्ये कॅन्सरवरील उपचारांचे मोठे रुग्णालय आहे. त्यामुळे पंजाबमधील रुग्ण तिथे सतत जात असतात. त्यामुळे पॅसेंजर ठरली आहे कॅन्सर एक्स्प्रेस.
पण एखाद्या रेल्वेगाडीला असे नाव असणे कोणालाच आवडणार नाही. ही ओळख पुसली जावी, यासाठी इंग्लंडमध्ये कैक वर्षांपासून वास्तव्यास असलेले कुलवंत धालीवाल प्रयत्न करीत आहेत. ते गेली ११ वर्षे पंजाबमध्ये कॅन्सरविषयी जागरुकता निर्माण करीत आहेत, कॅन्सरविरोधी मोहीम राबवत आहे. त्यांच्या आईचे निधन कॅन्सरने झाले. तेव्हापासून ते हे काम करीत आहेत.
वर्ल्ड कॅन्सर केअर आॅर्गनायझेशन या इंग्लंडमधील संस्थेच्या मदतीने ते हे काम करीत आहेत. त्यांनी येत्या ३ वर्षांत १५00 शिबिरे आयोजित करणार आहेत. आतापर्यंत त्यांनी १२ हजार ४२८ शिबिरे भरवली. धालीवाल आपली टीम व मोबाइल व्हॅन घेऊ न मोगा येथे आले आणि कॅन्सर तपासणी शिबीर नुकतेच घेतले. मानसा व मुक्तसर येथे कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. पंजाबच्या गावागावांत ते व त्यांची टीम तपासणी करते. तसेच रुग्णांना मोफत औषधे देते.

दोन वर्षांत पंजाबला करायचे आहे कॅन्सरमुक्त
पंजाबला पुढील दोन वर्षांत कॅन्सरमुक्त राज्य करण्याच्या उद्देशाने हे सारे काम धालीवाल करीत आहेत. पंजाबमध्ये तिसºया टप्प्यातच कॅन्सर झाल्याचे कळते. त्यामुळे मरणाºयांचे प्रमाण अधिक आहे. इंग्लंडमध्ये पहिल्या स्टेजमध्येच कॅन्सर लक्षात येत असल्याने तिथे मरणाºयांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पंजाबमध्येही या दुर्धर आजाराचे निदान लवकर व्हावे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

Web Title: Kansar Express run between Punjab and Rajasthan; Tried for 11 years to clear the identity of the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.