शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kanpur Violence: दंगलखोरांमध्ये घबराट; कानपूर हिंसाचाराचा तपास 'या' एनकाउंटर स्पेशलिस्टच्या हातात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 13:57 IST

Kanpur violence: कानपूरमधील हिंसाचार आणि दगडफेकीच्या घटनेनंतर 500 लोकांवर गुन्हे दाखल तर 24 जणांना अटक.

Kanpur violence: कानपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, सीएम योगी यांनी एन्काउंटर स्पेशालिस्ट IPS अजय पाल शर्मा यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी दिली आहे. कानपूरला पोहोचल्यानंतर अजय पाल शर्मा यांनी प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू केला असून, दंगलखोरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

शर्मा डायल 112 एसपी म्हणून तैनात अजय पाल शर्मा हे सध्या डायल 112 एसपी म्हणून तैनात आहेत. त्यांनी यापूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरस, नोएडा, शामली, रामपूर या जिल्ह्यांचे नेतृत्व केले आहे. कानपूरला पोहोचताच त्यांनी पोलीस आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांची भेट घेऊन घडामोडींवर चर्चा केली. आयपीएस अजय पाल शर्मा या संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अजय पाल शर्मा यांनी यापूर्वी लखीमपूर खेरी प्रकरणातही योग्य कारवाई केली आहे. 

500 जणांवर गुन्हे दाखलकानपूरमधील हिंसाचार आणि दगडफेकीच्या घटनेच्या एका दिवसानंतर, उत्तर प्रदेशपोलिसांनी शनिवारी 500 लोकांवर गुन्हे दाखल केले. हिंसाचाराच्या घटनांमध्ये 40 जण जखमी झाले आहेत. हिंसाचारग्रस्त भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून सध्या शांततेचे वातावरण आहे.

24 जणांना अटककानपूरचे पोलीस आयुक्त विजय सिंह मीना यांनी पत्रकारांना सांगितले की, या घटनेशी संबंधित 24 जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारच्या हिंसाचारप्रकरणी शनिवारी पोलिसांनी आणखी सहा जणांना अटक केली. मीना म्हणाले, 'आम्ही सीसीटीव्ही फुटेज आणि घटनांच्या इतर व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या मदतीने हिंसाचारात सहभागी असलेल्या एकूण 36 लोकांना ओळखले आहे. आतापर्यंत एकूण 24 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी 18 जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशkanpur-urban-pcकानपूर शहरीPoliceपोलिस