शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

Kanpur Violence: आता चालणार 'बाबा का बुलडोजर', कानपूर हिंसाचारानंतर पोलीस आयुक्तांनी जारी केली 100 घरांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 11:08 IST

Kanpur Violence: कानपूर हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींच्या अवैध घरांवर आता बुलडोझर चालणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून, शंभरहून अधिक घरांची यादी तयार करण्यात आली आहे.

Kanpur Violence: 3 जून रोही शुक्रवारच्या नमाजानंतर कानपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 54 आरोपींना अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी स्थानिक भाजप नेत्यालाही अटक केली आहे. त्याचबरोबर शहरात बुलडोझर चालवण्याची तयारी सुरू झाली आहे. कानपूरमधील नवीन रस्ता आणि आजूबाजूच्या परिसरातील बेकायदेशीरपणे बांधलेल्या इमारतींवर बुलडोझर चालणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तांनी 100 हून अधिक इमारतींची यादी केडीए वीसीकडे पाठवली आहे. या इमारतींच्या नकाशासोबत कायदेशीर की बेकायदेशीर याचीही माहिती मागवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानेही केडीएला चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यादीच्या पडताळणीनंतर प्रशासन आणि पोलिसांकडून बेकायदा इमारतींवर झटपट कारवाई सुरू केली जाणार आहे.

आतापर्यंत 54 जणांना अटक कानपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे त्यात असलेल्या आरोपींचे चेहरेही समोर येत आहेत. कानपूर पोलिसांनी आतापर्यंत 54 आरोपींना अटक केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कानपूर हिंसाचारप्रकरणी स्थानिक भाजप नेत्यासह 12 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. भाजप युवा मोर्चाचा माजी जिल्हा सचिव हर्षित श्रीवास्तव याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रक्षोभक मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पीआयएफचे सदस्य अठकेतकानपूर पोलिसांनी पीएफआयच्या पाच सदस्यांचीही ओळख पटवली असून त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. कानपूरचे पोलीस आयुक्त विजयसिंह मीना यांनी सांगितले की, कानपूर हिंसाचारात अटक करण्यात आलेल्या आरोपींशी असलेल्या संबंधांच्या आधारे पीएफआयच्या तीन सदस्यांना अटक करण्यात आली आहे. आणखी अनेक संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

पेट्रोल पंपाचा परवाना रद्दकानपूरमधील डेप्युटी पॅडजवळील पेट्रोल पंपावरुन हिंसाचार पसरवणाऱ्यांना बाटल्यांमध्ये पेट्रोल देण्यात आले. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये याचे पुरावे मिळाले आहेत. कारवाई करत पेट्रोल पंपाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. कानपूरमधील हिंसाचारात पेट्रोल बॉम्बचा प्रचंड वापर करण्यात आला, याशिवाय दगडफेकही करण्यात आली.

सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध घेतला जात आहेकानपूरमध्ये हिंसाचार कसा वाढला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचाही एटीएस प्रत्येक अँगलने तपास करणार आहे. यासाठी एडीजी एटीएस नवीन अरोरा कानपूरला पोहोचले असून, त्यांच्यासोबत खास कमांडोही उपस्थित आहेत. अरोरा एटीएसच्या जवानांसह हिंसाचारग्रस्त भागात गस्त घालत आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींची ओळख पटवली जात आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशkanpur-urban-pcकानपूर शहरीPoliceपोलिसyogi adityanathयोगी आदित्यनाथ