शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

शानदार जबरदस्त जिंदाबाद! तीन वर्षात एकट्यानं खोदला १६ एकरांचा तलाव, बुंदेलखंडच्या 'मांझी'ची प्रेरणादायी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 13:35 IST

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एका साधूने एकट्याने तीन वर्षे कोरडा प्राचीन तलाव खोदला असून ते आता बुंदेलखंडचे 'मांझी' म्हणून प्रसिद्धीस आले आहेत.

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एका साधूने एकट्याने तीन वर्षे कोरडा प्राचीन तलाव खोदला असून ते आता बुंदेलखंडचे 'मांझी' म्हणून प्रसिद्धीस आले आहेत. दररोज फावडा घेऊन खोदकाम करुन त्यांनी तलावाचं रुपडंच पालटून टाकलं आहे. त्यामुळे आता तलाव वर्षभर पाण्याने भरलेला असतो. गावातील लोकांच्या गरजाही या तलावामुळे पूर्ण होत आहेत. या साधूला शासनाकडूनही सन्मान मिळाला आहे.

हमीरपूर जिल्ह्यातील सुमेरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पचखुरा गावात एका वृद्ध साधूने प्राचीन तलावाचे रुपडे पालण्याचे मोठे काम केले आहे. या गावात १६ एकर क्षेत्रात एक तलाव आहे. हा तलाव देखील शेकडो वर्षे जुना आहे, जो कलारण दाई या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तलावाचे कधीही खोदकाम न झाल्याने त्याचे रूपांतर शेतात झाले. गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार, एकेकाळी हा तलाव वर्षभर पाण्याने भरलेला असायचा. मात्र गेल्या काही दशकांपासून या प्राचीन तलावात फक्त धूळ उडत होती.

हिवाळ्याच्या काळात गावातील तरुण या कोरड्या तलावाला क्रिकेटचे पीच बनवत असत, त्यामुळे तलाव नकाशावरूनही गायब झाला होता. मात्र तलावाच्या दुर्दशेबाबत कोणीही पुढे आले नाही. तलावाचे रूपांतर शेतात झाल्याने ग्रामस्थ व गुरांसमोर पाण्याचे संकट उभे ठाकले होते. या गावात अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पाण्याचे संकट होते, मात्र गावातील कृष्ण नंद महाराज यांनी हे संकट आव्हान म्हणून स्वीकारत फावडा हाती घेतला. त्यानंतर तीन वर्षांत तलावाचे स्वरूपच पालटले आहे. 

तलाव खोदण्यासाठी संताने तीन वर्ष केले खोदकामपाचखुरा बुजुर्ग गावचे रहिवासी संत कृष्ण नंद महाराज यांनी 1982 मध्ये संन्यास घेतला. 1986 मध्ये हरिद्वारमध्येच झालेल्या कुंभमेळ्यात त्यांनी महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरी महाराज यांच्याकडून गुरुदक्षिणा घेतली आणि तेथेच राहू लागले होते. 2014 मध्ये ते हरिद्वारहून गावी परतले आणि त्यांनी गावातील रामजानकी मंदिराला आपले आश्रयस्थान बनवले. मंदिराजवळील पुरातन तलावाची दुर्दशा पाहून त्यांनी मोठा निर्णय घेत 2015 साली फावडे उचलून एकट्याने तलाव खोदण्यास सुरुवात केली. सलग तीन वर्षे कोरड्या तलावाचे उत्खनन करून गावातील या संताने तलावाच्या तळापासून तीन हजारांहून अधिक ट्रॉली माती खोदून त्याचे पुन्हा तलावात रूपांतर केले आहे.

संत कृष्ण नंद महाराज आता बुंदेलखंडचे 'मांझी' झालेतसंत कृष्ण नंद महाराज यांच्या कामाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे. तीन वर्षांत कोरड्या तलावाचे उत्खनन करून त्याला जुन्या स्वरूपात आणल्यानंतर आता गावकरी त्यांना बुंदेलखंडचे 'मांझी' म्हणून लागले आहेत. गेल्यावर्षी हा तलाव उन्हाळ्यात पाण्याने भरला होता. यावेळी तलावातील पाणी कमी होत असल्याचे पाहून संताने पुन्हा फावडे उचलले आहे. गेल्या जानेवारीपासून ते तलावात फावडे घेऊन सातत्याने खोदकाम करत आहेत. त्यामुळे कडक उन्हात ते सुकण्याची शक्यता आता संपुष्टात आली आहे. गावातील इंदलसिंग यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी सांगितले की, हा तलाव शेकडो वर्षे जुना असून, त्याचे अस्तित्वच नाहीसे झाले होते. मात्र अवघ्या तीन वर्षांत बाबा कृष्ण नंद महाराज यांनी स्वत:च फावडे वापरून तलावाचे स्वरूप पालटले आहे.

स्वयंसेवी संस्थांनीही केला सन्मानप्राचीन वारसा आणि तलाव जपण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे संत कृष्ण नंद महाराज म्हणतात. 2016 मध्ये तत्कालीन राज्यमंत्री राजकुमारी कुशवाह यांनी गावात येऊन त्यांना वीस हजार रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला होता, तर डेहराडूनच्या मीनाक्षी अरोरा यांनीही गावात येऊन त्यांचा गौरव केला होता. गावातील तलावाचे स्वरूप बदलल्याच्या वृत्तावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही ट्विट केले होते. तर काँग्रेसच्या बड्या नेत्यांनीही गावात येऊन त्यांचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी