शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी कानपूरमध्ये हवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 11:59 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना प्रकृती अस्वास्थामुळे नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कानपूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना प्रकृती अस्वास्थामुळे नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी कानपूरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी हवन केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारी (11 जून) त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या अंगात ताप नसून त्यांना डायलेसिसवर ठेवण्यात आले होते. त्यांना मूत्रसंसर्ग झालेला नाही, असेही रात्री हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज कधी मिळणार?, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.  वाजपेयी यांना रुटिन चेकअपसाठी दाखल केले असून रात्री घरी पाठवण्यात येईल, असे आधी सांगण्यात आले. मात्र नंतर त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अटलबिहारी वाजपेयी यांचे वय 93 असून, ते स्मृतिभ्रंश, मधुमेहामुळे अनेक वर्ष अंथरुणाला खिळून आहेत. ते सध्या कोणाला ओळखूही शकत नाहीत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली भेटवाजपेयी यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर संध्याकाळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा व त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण आडवानी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. सध्या वाजपेयी यांना भेटण्याची कोणालाही मुभा नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 50 मिनिटं होते हॉस्पिटलमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्स हॉस्पिटलमध्ये सोमवारी दाखल झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मोदींनी डॉक्टरांची भेट  घेऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. यादरम्यान मोदी यांनी वाजपेयी यांच्या कुटुंबीयांसोबतही बातचित केली. जवळपास 50 मिनिटं ते हॉस्पिटलमध्ये थांबले होते. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयी