शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

100 कोटींच्या जुन्या नोटा लपवणा-या 'त्या' ला 483 कोटी रूपयांचा दंड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 13:55 IST

कानपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी केलेल्या छापेमारीत जवळपास 100 कोटी रूपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. यामध्ये व्यापारी आनंद खत्री याच्यासह 16 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. याप्रकरणी आनंद खत्री याला दंडाच्या स्वरूपात तब्बल 483 कोटी रूपये

कानपूर :  कानपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी केलेल्या छापेमारीत जवळपास 100 कोटी रूपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. यामध्ये व्यापारी आनंद खत्री याच्यासह 16 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. याप्रकरणी आनंद खत्री याला दंडाच्या स्वरूपात तब्बल 483 कोटी रूपये भरावे लागू शकतात. उत्तर प्रदेश पोलिसांनी आनंद खत्रीच्या विरोधात भारतीय दंड विधान आणि स्पेसीफाइड बॅंक नोट्स अॅक्ट 2017 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानुसार व्यवहारातून बाद केलेल्या नोटा बाळगल्याप्रकरणी तुरूंगवासासोबतच जप्त केलेल्या रकमेच्या पाचपट आयकर भरावा लागतो. दंड भरण्यास सक्षम नसल्यास संपत्ती जप्त करण्याचीही तरतूद यामध्ये आहे. यानुसार खत्रीकडे सापडलेल्या 96.62 कोटींच्या नोटांसाठी त्याला 483.1 कोटी रूपये दंड भरावा लागू शकतो.टक्केवारीवर नफा घेवून खत्री नोटा बदलून द्यायचा. पोलीस आणि एनआयएच्या पथकाने मंगळवारी 3 ते 4 हॉटेल्स आणि बांधकाम सुरू असणाऱ्या परिसरात  छापेमारी केली. यावेळी स्वरूप नगर परिसरातील एका बंद घरात मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा सापडल्या.  घरातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तीन गाद्यांमध्ये लपवण्यात आलेल्या 500 - 1000 च्या जुन्या नोटा पाहून पोलिसही अवाक झाले. यामागे जुन्या नोटा बदलून देणारं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या प्रकरणाचं कनेक्शन दहशतवादी संघटनांशी जोडण्यास पोलिसांनी नकार दिला. आरोपी आनंद खत्री श्रीमंत घरातील आहे. तो 20 ते 25 टक्के नफा घेऊन तो या नोटा बदलून देतो असं लोकांना सांगायचा. पण त्याला ज्या ठिकाणाहून नोटा बदलवायच्या होत्या त्यामध्ये अपयश आल्याने घरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा जमा होत गेल्या. कानपूर पोलीस या सगळ्या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.  

टॅग्स :Note BanनोटाबंदीUttar Pradeshउत्तर प्रदेश