दरेगाव येथे कानिफनाथ यात्रोत्सव संपन्न
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:37+5:302015-03-14T23:45:37+5:30
दरेगाव : संपूर्ण जिल्ात कानिफनाथ महाराजांचे प्रसिद्ध स्थान असणार्या श्रीक्षेत्र दरेगाव येथे हजारो भाविकांच्या साक्षीने श्रद्धेच्या रंगात आणि भक्तिच्या जल्लोषात कानिफनाथ महाराज यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला.

दरेगाव येथे कानिफनाथ यात्रोत्सव संपन्न
द ेगाव : संपूर्ण जिल्ात कानिफनाथ महाराजांचे प्रसिद्ध स्थान असणार्या श्रीक्षेत्र दरेगाव येथे हजारो भाविकांच्या साक्षीने श्रद्धेच्या रंगात आणि भक्तिच्या जल्लोषात कानिफनाथ महाराज यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला.हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील कानिफनाथ महाराजांच्या यात्रोत्सवास रंगपंचमीला प्रारंभ झाला. या दिवशी सकाळी गावातून रथयात्रेस प्रारंभ झाला. यावेळेस हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. रथापुढे नवस केलेल्या भाविकांनी लोटांगणे घेतली. डीजे, वाजंत्री, भजनांसह सवाद्य मिरवणूक पार पडत असतानाच मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रंगाचा वर्षाव करीत जोशपूर्ण रंगफेकीतून नाचणारे युवक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. जिल्ातून ठिकठिकाणांहून आलेल्या काठ्यांचीही मिरवणूक हनुमान मंदिराजवळ पार पडली. सायंकाळी रामायणावर आधारित आखाडी होणार होती; मात्र अवेळी आलेल्या पावसामुळे आखाडी दुसर्या दिवशी घेण्यात आली. तत्पूर्वी दोन दिवस रात्री लोकनाट्य तमाशा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडला. पंचमीच्या दुसर्या दिवशी षष्ठीला गावाच्या पश्चिम भागात असणार्या कानिफनाथ मंदिराजवळ भव्य यात्रा भरली. भाविकांनी दर्शनासाठी तसेच नवसपूर्तीसाठी गर्दी केली होती. येथे यावर्षी नियोजनबद्धरीत्या कुस्त्यांचा फड (आखाडा) रंगला.जिल्हा व महाराष्ट्रातून विविध ठिकाणांहून पहिलवानांनी सहभाग घेतला. गावकर्यांतर्फे विजेत्या पहिलवांना रोख स्वरुपात बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यात्रेत चांदवड पोलीस स्थानकातर्फे चोख बंदोबस्त राखण्यात आला. मंदिर परिसरात षष्ठीला दुपारपासून ते सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांनी आकाश पाळणे, विविध मनोरंजनात्मक खेळ पाहणे आणि खरेदीचा आनंद लुटण्यासाठी गर्दी केली होती. भाविकांनी यात्रेसाठी आलेल्या नागरिकांसाठी महाप्रसाद आयोजनही केले होते. (वार्ताहर)-----