कन्नड लेखकाला जिवे मारण्याची धमकी

By Admin | Updated: September 11, 2015 03:57 IST2015-09-11T03:57:48+5:302015-09-11T03:57:48+5:30

कन्नड लेखक एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्येच्या घटनेची शाई वाळत नाही तोच, आणखी एक विचारवंत, लेखक व परखड वक्ते के. एस. भगवान यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

Kannada writer threatens to kill him | कन्नड लेखकाला जिवे मारण्याची धमकी

कन्नड लेखकाला जिवे मारण्याची धमकी

म्हैसूर : कन्नड लेखक एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्येच्या घटनेची शाई वाळत नाही तोच, आणखी एक विचारवंत, लेखक व परखड वक्ते के. एस. भगवान यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. इंग्रजी भाषेत लिहिलेले धमकीचे पत्र त्यांना मिळाले असून, दिवस मोजायला सुरुवात करा. पुढचा नंबर तुमचाच, असे या पत्रात लिहिले आहे. भगवान यांच्या पत्नीने गुरुवारी ही माहिती दिली. येथील उदयारवी मार्गावरील कुवेम्पुनगरात भगवान यांचे घर आहे. बुधवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास पोस्टमनने हे पत्र त्यांच्या घरी टाकले. (वृत्तसंस्था)

Web Title: Kannada writer threatens to kill him