उघडयावर लघुशंका करताना पकडले म्हणून कन्हैयाने विद्यार्थिनीला धमकावले
By Admin | Updated: March 10, 2016 19:51 IST2016-03-10T19:51:47+5:302016-03-10T19:51:47+5:30
कन्हैया कुमारला मागच्यावर्षी विद्यार्थिनीसोबत गैरवर्तणूक केली म्हणून जेएनयू विद्यापीठ प्रशासनाने दंड ठोठावला होता.

उघडयावर लघुशंका करताना पकडले म्हणून कन्हैयाने विद्यार्थिनीला धमकावले
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - देशद्रोहाचा आरोप आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला मागच्यावर्षी विद्यार्थिनीसोबत गैरवर्तणूक केली म्हणून जेएनयू विद्यापीठ प्रशासनाने दंड ठोठावला होता. त्याच्यावर विद्यार्थिनीला धमकावण्याचा आरोप होता.
मागच्यावर्षी १० जून २०१५ रोजी ही घटना घडली होती. कमलेश परमेश्वरी असे तक्रारदार विद्यार्थिनीचे नाव आहे. ही मुलगी सकाळी धावण्यासाठी गेली असताना कन्हैया विद्यापीठाच्या आवारात मोकळया जागेमध्ये लघुशंका करत होता. मी त्याला असे करण्यापासून रोखले. विद्यापीठात सुविधा असताना रस्त्यावर लघुशंका करण्यापासून रोखले.
त्यावेळी कन्हैया माझ्यावर आक्रमकपणे चालून आला. त्याने मला वेडपट म्हटले आणि धमकावले सुद्धा असे कमलेशने तक्रारीत म्हटले होते. कन्हैयाला या गैरवर्तणूकीसाठी तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता. कन्हैयाला दोषी ठरवल्याचे पत्र कमलेशने फेसबुकवर पोस्ट केले आहे. तक्रारदार विद्यार्थिनी आता दिल्ली विद्यापीठात शिकवते.