कन्हैय्या कुमारला गोळ्या घालणा-याला 11 लाखांचं बक्षीस जाहीर

By Admin | Updated: March 5, 2016 18:31 IST2016-03-05T18:31:00+5:302016-03-05T18:31:00+5:30

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारला गोळ्या घालणा-याला 11 लाखांचं बक्षीस जाहीर करणारी पोस्टर्स दिल्लीत लावण्यात आली आहेत

Kanhaiya Kumar releases 11 lakh prize for shooting | कन्हैय्या कुमारला गोळ्या घालणा-याला 11 लाखांचं बक्षीस जाहीर

कन्हैय्या कुमारला गोळ्या घालणा-याला 11 लाखांचं बक्षीस जाहीर

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ५ - जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारला गोळ्या घालणा-याला 11 लाखांचं बक्षीस जाहीर करणारी पोस्टर्स दिल्लीत लावण्यात आली आहेत. पुर्वांचल सेनेच्या आदर्श शर्मा यांनी ही पोस्टर्स लावली असून त्यात त्यांचं नाव आणि मोबाईल नंबरही दिलेला आहे. 
 
जो कोणी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आणि देशद्रोही कन्हैय्या कुमारला गोळ्या घालेल त्याला पुर्वांचल सेनेकडून 11 लाखांचं बक्षीस दिलं जाईल असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे मात्र आम्हाला लगेच न्याय हवा आहे असं आदर्श शर्मा शनिवारी बोलले होते. 
 
आम्हाला या देशद्रोह्याचा मृत्यू हवा आहे. त्याने देशविरोधात घोषणा देऊन भारतमातेचा अपमान केला आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे मात्र न्याय मिळण्यास फार उशीर लागतो. आम्हाला लगेच न्याय हवा आहे आणि म्हणूनच आम्ही त्याची हत्या करणा-याला 11 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे असं आदर्श शर्मा बोलले आहेत. हे पोस्टर्स संपुर्ण दिल्लीत लावण्यात आले आहेत. आम्ही उत्तरप्रदेश आणि बिहारच्या लोकांसाठी काम करतो, कन्हैय्याचं घर माझ्या घरापासून फक्त 10 किमी अंतरावर आहे. आमची भुमी असल्या देशद्रोह्यांना जन्म देतं नाही आणि म्हणूनचं हे असं करण्याचा निर्णय घेतल्यांच आदर्श शर्मा यांनी सांगितलं आहे. 
 
पोलिसांनी याप्रकरणाची नोंद घेतली असून चौकशी करत आहेत. ज्यांनी हे पोस्टर्स लावले आहेत त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल. लवकरच गुन्हा नोंद करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 

 

Web Title: Kanhaiya Kumar releases 11 lakh prize for shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.