कन्हैय्या कुमार मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची वकिलांना नोटीस
By Admin | Updated: February 26, 2016 15:01 IST2016-02-26T15:00:52+5:302016-02-26T15:01:31+5:30
पतियाळा न्यायालयात कन्हैय्या कुमारला मारहाण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विक्रम चौहान, यशपाल सिंग आणि ओम शर्मा यांना वकिलांना नोटीस पाठवली आहे

कन्हैय्या कुमार मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची वकिलांना नोटीस
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २६ - पतियाळा न्यायालयात कन्हैय्या कुमारला मारहाण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 3 वकिलांना नोटीस पाठवली आहे. विक्रम चौहान, यशपाल सिंग आणि ओम शर्मा या तिघांना नोटीस पाठवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने वकिलांना तुमच्याविरोधात अवमान केल्याप्रकऱणी कारवाई का करण्यात येऊ नये ? यावर उत्तर देण्यास सांगितल आहे.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनादेखील नोटीस पाठवली आहे. विशेष तपास पथकाने या प्रकरणाचा तपास करावा चौकशी करावी तसंच वकिलांविरोधात अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणा-या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे. वकिल कामिनी जाधव यांनी ही याचिका केली आहे. सर्वोच्च न्यायालय 4 मार्चला या प्रकरणावर सुनावणी घेणार आहे.