शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

'मागची 5 वर्षं आधार लिंक करण्यात गेली; आता पुढची 5 वर्षं जन्मदाखले मिळवण्यात जातील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 17:38 IST

Citizen Amendment Bill : नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन मोदी सरकार लक्ष्य

पाटणा: जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारनं नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. कन्हैयानं दोन ट्विट करुन सरकारवर तोफ डागली आहे. देशातलं राष्ट्रवादी सरकार सार्वजनिक क्षेत्राला चार-आठ आण्याला विकून टाकेल, अशा शब्दांत कन्हैयानं सरकारवर टीका केली आहे.  कन्हैयानं त्याच्या पहिल्या ट्विटमधून सार्वजनिक क्षेत्राचं खासगीकरण, शिक्षण आणि रोजगारांवर भाष्य केलं आहे. 'मागील ५ वर्षे आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्यात गेली. आता पुढील ५ वर्ष आजोबांच्या आजोबांचे जन्मदाखले तयार करण्यात जातील. याच काळात राष्ट्रवादी सरकार सार्वजनिक क्षेत्राला चार-आठ आण्यात विकेल आणि ट्रेनच्या तिकीटापासून महाविद्यालयाच्या पदवीपर्यंत सर्व काही गरिबांच्या आवाक्याबाहेर जाईल,' असं कन्हैयानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.  दुसऱ्या ट्विटमधूनही कन्हैया कुमारनं खासगीकरणावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 'देशवासीयांना कागदपत्रं मिळवण्यासाठी विविध सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवायला लागतील. या सर्व गदारोळात ओएनजीसी, बीएसएनएल, एअर इंडिया, रेल्वेची विक्री झालेली असेल. त्यानंतर खासगी तेजस एक्स्प्रेसमधून ४०० रुपयांऐवजी ४००० रुपयांचं तिकीट काढून प्रवास करावा लागेल आणि १० लाख रुपये खर्च करुन पदवी घेतलेला तरुण १० हजार रुपये महिना पगाराची नोकरी करेल,' अशा शब्दांमध्ये कन्हैयानं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीkanhaiya kumarकन्हैय्या कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा