शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

कोलकातामधील रॅलीत कन्हैया कुमारवर शाईफेक, धक्काबुक्कीत तीन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 17:18 IST

जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारवर कोलकातामधील रॅलीत शाई फेकण्यात आली आहे. यावेळी दोन संघटनेत झालेल्या धक्काबुक्कीत तीन जण जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली, दि. 23 -  जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारवर कोलकातामधील रॅलीत शाई फेकण्यात आली आहे. यावेळी दोन संघटनेत झालेल्या धक्काबुक्कीत तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दक्षिण कोलकातामधील जाधवपूर येथे अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली होती. यावेळी त्याच्यावर शाई फेकण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जाधवपूर येथील रॅलीमध्ये माकप आणि हिंदुत्ववादी समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली. या झटापटीत तीन जण जखमी झाले आहेत.कन्हैय्या कुमार याच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीमध्ये हिंदुत्ववादी समर्थकांच्या गटाशी संबंधित काही लोकांनी कन्हैया कुमारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कन्हैयाने येथून निघून जावे, असा इशारा दिला. त्याला विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यात तीन जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

माकपचे वरिष्ठ नेते प्रबीर देव याविषयी म्हणाले की, कन्हैया कुमारच्या रॅलीदरम्यान अचानक काही लोकांनी घोषणाबाजी सुरू केली. कन्हैया कुमारने परत जावे, अशी जोरदार मागणी केली. त्यावेळी त्याच्या समर्थकांनी आमच्या समर्थकांना धक्काबुक्की केली. त्याला आमच्या समर्थकांनीही विरोध केला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले. 

तरुणाने कन्हैया कुमारवर भिरकावली चप्पल - 

2016 मध्ये हैदराबाद विश्वविद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान कन्हैय्या कुमारवर चप्पल भिरकावण्यात आली होती.  कार्यक्रम सुरु असताना एका विद्यार्थ्यांना भारत माता की जय अशा घोषणा देत कन्हैय्या कुमारच्या दिशेने चप्प्ल फेकली. पोलिसांनी चप्पल फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं होतं. रोहीत वेमुला आत्महत्येप्रकरणी कन्हैय्याने विद्यार्थ्यांची भेट संवाद साधला. त्यावेळी बोलत असताना हा प्रकार घडला

‘कन्हैयाकुमार’सारख्या प्रवृत्तींना मिळावी ‘सजा-ए-मौत’ -अखंड भारतासाठी जवान रात्रंदिवस सीमेवर लढत असतात. त्यांच्या वेदना कोणालाही जाणून घेता येणार नाहीत. सैनिकांबाबत आपण जास्त भावूक होत आहोत, अशी विधाने सर्रास केली जातात. सैनिक आणि देशाच्या सुरक्षेविरोधात बोलणारे अनेक कन्हैया कुमार आपल्यामध्येच आहेत. त्यांना ‘सजा-ए-मौत’च दिली पाहिजे, अशा परखड शब्दांमध्ये ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी निशाणा साधला. बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे किशोरी आमोणकर व्यासपीठावर विक्रम गोखले यांना बलराज साहनी पुरस्कार, तर इंदुमती जोंधळे यांना कैफी आझमी पुरस्काराने गौरवण्यात आले. 

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे