शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
6
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
7
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
8
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
10
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
11
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
12
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
13
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
14
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
15
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
16
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
17
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
18
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
19
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
20
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही

कन्हैया कुमार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; सीपीआयकडून बेगुसरायमधून उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 12:19 PM

महाआघाडीसोबतची चर्चा फिस्कटल्यानं सीपीआयच्या तिकीटावर निवडणूक लढवणार

पाटणा: विद्यार्थी नेता म्हणून प्रकाशात आलेले कन्हैया कुमार बिहारच्या बेगुसरायमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये महाआघाडी करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. मात्र महाआघाडीनं तिकीट न दिल्यानं कन्हैया कुमार बेगुसराय मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणूक लढवणार आहे. पक्षाचे बिहार राज्याचे सचिव सत्यनारायण सिंह यांनी याबद्दलची माहिती दिली. कन्हैया कुमार बेगुसरायमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्यानं या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणारे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, मोदी लाटेतही स्वत:चा ठसा उमटवणारे राष्ट्रीय जनता दलाचे तन्वीर हसन यांच्याशी कन्हैया कुमार यांना दोन हात करावे लागणार आहेत. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील निवडणुकांमध्ये यशस्वी राजकारण करत तरुणांमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या कन्हैया कुमार यांना इतर डाव्या पक्षांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. कन्हैया कुमार यांना राष्ट्रीय जनता दलाकडून तिकीट मिळेल, अशी अपेक्षा सीपीआयला होती. मात्र राजदनं कन्हैया कुमार यांना उमेदवारी न दिल्यानं सीपीआयनं त्यांना आपल्या तिकीटावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांपूर्वी बेगुसराय मतदारसंघ सीपीआयचा बालेकिल्ला मानला जायचा. अनेक निवडणुकांमध्ये सीपीआच्या उमेदवारानं बेगुसरायमधून यश संपादन केलं आहे. मात्र नव्वदच्या दशकानंतर डाव्यांचा हा बालेकिल्ला ढासळला. हा मतदारसंघ राखण्यासाठी डाव्यांना राजदची गरज भासू लागली. त्यामुळे राजदचा समावेश असलेल्या महाआघाडीकडून कन्हैया कुमार यांना उमेदवारी मिळेल, अशी आशा सीपीआयला होती. मात्र त्यांना राजदनं तिकीट दिलं नाही. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkanhaiya kumarकन्हैय्या कुमार