शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 19:34 IST

Kangana Ranaut: मागच्या काही दिवसांमध्ये कंगना यांनी शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांबाबत केलेल्या विधानांमुळे भाजपाची कोंडी झाली होती. त्यानंतर आज गांधी जयंती दिवशी कंगना राणौत यांनी केलेल्या एका पोस्टमुळे वादाला तोंड फुटलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौत या त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने अडचणीत सापडत आहेत. तसेच्या त्यांच्या वक्तव्यांवर स्पष्टीकरण देताना पक्षालाही नाकी नऊ येत आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये कंगना यांनी शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांबाबत केलेल्या विधानांमुळे भाजपाची कोंडी झाली होती. त्यानंतर आज गांधी जयंती दिवशी कंगना राणौत यांनी केलेल्या एका पोस्टमुळे वादाला तोंड फुटलं आहे. या पोस्टमध्ये कंगना लिहितात की, ‘’देशाचे राष्ट्रपिता असत नाही, तर देशाचे सुपुत्र असतात. धन्य आहेत ते भारतमातेचे सुपुत्र’’. या पोस्टसोबत कंगना यांनी देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा फोटो ठेवला आहे. दरम्यान, कंगना यांच्या या पोस्टविरोधात काँग्रेसने आक्रमक प्रतिक्रिया दिली असून, त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते राजकुमार वर्मा यांनी केली आहे.  

आज महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जयंती आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांनी या दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली आहे. यादरम्यान, कंगना राणौत यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहिले की, ‘’देशाचे राष्ट्रपिता असत नाही, तर देशाचे सुपुत्र असतात. धन्य आहेत ते भारतमातेचे सुपुत्र’’ या पोस्टखाली कंगना यांनी लालबहादूर शास्त्री यांचा फोटो शेअर केला. तसेच जय जवान, जय किसानची घोषणा देणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त शतश: नमन असे लिहिले. या पोस्टच्या पुढच्या स्लाइडमध्ये कंगना यांनी एक व्हिडीओ मेसेजही शेअर केला. स्वच्छता ही स्वातंत्र्याएवढीच आवश्यक आहे. महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या दृष्टीकोनाला आमचे पंतप्रधान पुढे घेऊन जात आहेत. दरम्यान, कंगना यांच्या या पोस्टवर काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते राजकुमार वर्मा म्हणाले की, कंगना राणौत वारंवार देशविरोधी विधानं करत आहेत. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. भाजपा त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गांधीजींच्या प्रतिमेवर पुष्प अर्पण करत आहेत. तर दुसरीकडे भाजपा खासदार गांधीजींविरोधात अशा गोष्टी बोलत आहेत. कंगना यांच्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाMahatma Gandhiमहात्मा गांधी