शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kangana Ranaut: "फक्त दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी..."; कंगना राणौतने कुणाल कामराला सुनावलं (Video)

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:48 IST

Kangana Ranaut React to Kunal Kamra Row: भाजपाची खासदार कंगना राणौतची प्रतिक्रिया समोर आली आहे. अभिनेत्रीने कुणालच्या कॉमेडी एक्टचा निषेध केला आहे.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सादर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामरा विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कामराने केलेल्या या टिप्पणीनंतर त्याच्या शोच्या सेटवर धडक देत शिवसैनिकांनी सेटची मोडतोड केली. याच दरम्यान आता भाजपाची खासदार कंगना राणौतने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्रीने कुणालच्या कॉमेडी एक्टचा निषेध केला आहे. "तुम्ही कोणीही असलात तरी, कोणाचाही अपमान करणं किंवा बदनामी करणं योग्य नाही. व्यक्तीसाठी आदरच सर्वस्व आहे. तुम्ही विनोदाच्या नावाखाली अपमान करत आहात. त्यांच्या कामाचा अपमान करत आहेत. शिंदेजी एकेकाळी रिक्षा चालवत होते. आज ते स्वतःच्या हिंमतीने पुढे आले आहेत. स्वतःची काय पात्रता आहे? हे लोक कोण आहेत? जे आयुष्यात काहीच करू शकले नाहीत."

"आपला समाज कुठे चाललाय?"

"कॉमेडीच्या नावाखाली शिवीगाळ करणं, आपल्या धर्मग्रंथांची खिल्ली उडवणं... लोकांची खिल्ली उडवणं, माता-भगिनींची खिल्ली उडवणं... आजकाल हे लोक स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणत आहेत... मला विचारायचं आहे की, आपला समाज कुठे चाललाय? फक्त २ मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी समाज कुठे चालला आहे... आपण याचा विचार करायला हवा. फडणवीसजींनी बरोबर सांगितलं आहे, त्यांचा असा विश्वास आहे की, आपण जे काही बोलतो त्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल" असं कंगनाने म्हटलं आहे. 

एकनाथ शिंदेंविरोधात बोलण्यासाठी सुपारी मिळाली? कुणाल कामरा म्हणाला, "माझं बँक अकाऊंट..."

कॉमेडियन कुणाल कामरावर गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं. तुला सुपारी मिळालेली का? या प्रश्नावर तो म्हणाला, "मी का सुपारी घेऊ? तुम्ही माझं बँक अकाऊंट तपासू शकता. मी मराठीत नाही तर हिंदीत शो केला आहे. मी कोणाकडूनही सुपारी घेतलेली नाही आणि मला कोणी पैसे दिलेही नाहीत." 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाKunal Kamraकुणाल कामराEknath Shindeएकनाथ शिंदेViral Videoव्हायरल व्हिडिओ