शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

'ती' गोष्ट सिद्ध करा, पद्मश्री पुरस्कार परत करेन; कंगना रणौतचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 05:56 IST

स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांचा मी अपमान केला असे सिद्ध केल्यास पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारला परत करेन, असेही आव्हान तिने दिले आहे.

नवी दिल्ली : १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी कोणते युद्ध झाले होते, असा सवाल अभिनेत्री कंगना रणौत हिने आपल्या टीकाकारांना विचारला आहे. स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांचा मी अपमान केला असे सिद्ध केल्यास पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारला परत करेन, असेही आव्हान तिने दिले आहे.१९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले असे अत्यंत वादग्रस्त उद्गार कंगना रणौतने नुकतेच काढले होते. त्यामुळे सर्वच स्तरांतून तिचा तीव्र निषेध करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर कंगनाने म्हटले आहे की, महात्मा गांधी यांनी भगतसिंग यांना वाचविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, तसेच सुभाषचंद्र बोस यांनादेखील कधीही पाठिंबा दिला नाही. एका पुस्तकातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, अरविंद घोष, बिपीनचंद्र पाल यांची अवतरणे उद्धृत करून कंगना रणौत हिने सांगितले की, स्वातंत्र्यसंग्रामात झाशीची राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस, स्वा. सावरकर यांनी मोठे योगदान दिले याची मला माहिती आहे. १८५७ सालच्या स्वातंत्र्यसमरात सर्वजण एकजुटीने लढले होते. मात्र १९४७ साली एखादे युद्ध झाले होते का, याबाबत मात्र मी अनभिज्ञ आहे.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतpadma shri awardsपद्मश्री पुरस्कार