पुन्हा कंदहार ?, दिल्ली - काबूल विमानाच्या अपहरणाचा इशारा
By Admin | Updated: January 4, 2015 11:46 IST2015-01-04T11:43:26+5:302015-01-04T11:46:20+5:30
एअर इंडियाच्या दिल्ली - काबूल या विमानाच्या अपहरणाचा इशारा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला असून यानंतर हायअलर्टचा इशाराही देण्यात आला आहे.

पुन्हा कंदहार ?, दिल्ली - काबूल विमानाच्या अपहरणाचा इशारा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - एअर इंडियाच्या दिल्ली - काबूल या विमानाच्या अपहरणाचा इशारा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला असून यानंतर हायअलर्टचा इशाराही देण्यात आला आहे. दहशतवादी या विमानाचे अपहरण करण्याचा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे.
१९९९ मध्ये दहशतवाद्यांनी कंदहार येथे आयसी ८१४ या विमानाचे अपहरण करत होते. दहशतवादी पुन्हा याची पुनरावृत्ती करु शकतात अशी माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. अपहरणासाठी दहशतवादी एअर इंडियाच्या विमानालाच टार्गेट करतील असे गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे. यानंतर दिल्ली विमानतळावर हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. प्रवाशांसोबतच विमानतळावरील कर्मचा-यांचीही कसून तपासणी केली जात आहे.