Extra Marital Affairs in Marathi: बदलती जीवनशैली, वाढत्या अपेक्षा आणि त्याचा नातेसंबंधांवर होत असलेले दुष्परिणाम यामुळे विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे वाढू लागली आहे. शहरांबरोबर ग्रामीण भागातही असे प्रकार सर्रास घडत आहेत. पण, भारतात अशी प्रकरणे कोणत्या शहरात सर्वाधिक घडतात, याबद्दलची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जगाभरात डेटिंग प्लॅटफॉर्मसाठी प्रसिद्ध असलेल्या अॅशले मॅडिसन या डेटिंग साईटने एक सर्व्हे केला. त्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विवाहबाह्य संबंधांबद्दल अहवालामध्ये काय?
अॅशले केलेल्या पाहणीमध्ये असे आढळून आले की, तामिळनाडूमधील कांचीपूरम या शहरात विवाहबाह्य संबंध सर्वाधिक आहे. वेगाने नागरिकरण होत असलेल्या मुंबई, दिल्लीसारख्या शहरांना मागे टाकत विवाहबाह्य संबंधांमध्ये हे शहर देशात पहिले असल्याचे यातून समोर आले.
२०२४ मध्ये अॅशले जेव्हा याचसंदर्भात सर्वेक्षण केले होते तेव्हा त्यात कांचीपूरम १७ व्या क्रमांकावर होते. ते एका वर्षात पहिल्या क्रमांकावर कसे पोहोचले याबद्दल मात्र काहीही सांगण्यात आलेले नाही.
दिल्लीतील परिस्थितीही कांचीपूरमसारखीच?
अॅशलेने यूजरच्या माहितीनुसार ही पाहणी केली आहे. विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणात मध्य दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली एनसीआर मध्ये या अॅपवर सक्रिय असलेला यूजर खूप आहे. मध्य दिल्ली, दक्षिण पश्चिम दिल्ली, पूर्व दिल्ली, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्ली हे सहा जिल्हे पहिल्या २० शहरांमध्ये आहेत.
अॅशलेच्या सर्व्हेमध्ये असलेल्या पहिल्या २० शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही. मुंबईही या सर्व्हेमध्ये पहिल्या २० शहरांमध्ये नाही. अॅशलने दिलेल्या माहितीनुसार, अॅपवर यूजर्संची दररोजची अॅक्टिव्हिटी, एंगेजमेंटबद्दल माहिती, याचे विश्लेषण करून हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.