कामठी... नाताळ

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:08+5:302014-12-25T22:41:08+5:30

कामठीत नाताळ सण उत्साहात

Kamthi ... Christmas | कामठी... नाताळ

कामठी... नाताळ

मठीत नाताळ सण उत्साहात
कामठी : प्रेम, शांती व बंधुत्वाचा उपदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव नाताळ सण शहरातील विविध चर्चमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला ख्रिस्ती बांधवांनी हा सण साजरा केला.
बुधवारी रात्री ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमात ख्रिस्ती समाजबांधवांनी भजन, गीत व उपदेश आदी कार्यक्रमांचे आयोजन केले. सोबतच पूजा, केरोल सिंसिंग रात्री १२ वाजता मिस्सा पूजेचे आयोजन करण्यात आले.
गुरुवारी सकाळीच विविध चर्चमध्ये विशेष साधना सभेचे आयोजन पार पडले. प्रसंगी नाताळ सणाच्या निमित्ताने गोड पदार्थ व केकचे वाटप करण्यात आले. प्रसंगी विशेष प्रार्थना करण्यात आली. मान्यवरांनी प्रभू येशू यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी प्रभू येशू ख्रिस्तांच्या जीवनावर आधारित देखावेसुद्धा तयार करण्यात आले. जुनी छावणी येथील ईम्मानुएल प्रार्थना घरी गुरुवारी सकाळपासूनच विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावेळी पास्टर मनीष मधुमटके, ओमकार वाहाणे, किशोर मलिक, मुकेश गिचरे, चंदन बंसे, सचिन पसेरकर, सचिन मेश्राम, राजू गजभिये, कोमल वासनिक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Kamthi ... Christmas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.