शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

पोलिसांच्या दबावामुळे घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, कमलेश तिवारींच्या आईचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 7:34 PM

हिंदू समाज पार्टीचे नेते कमलेश तिवारी यांची भररस्त्यात वार करून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, कमलेश तिवारी यांच्या आईने खळबळजनक दावा केला आहे.

लखनौ - हिंदू समाज पार्टीचे नेते कमलेश तिवारी यांची भररस्त्यात वार करून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, कमलेश तिवारी यांच्या कुटुंबीयांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. मात्र या भेटीनंतर कमलेश तिवारी यांच्या आईने खळबळजनक दावा केला आहे. पोलिसांनी आणलेल्या दबावामुळे आम्ही योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली, असा दावा कमलेश तिवारी यांची आई कुसूम तिवारी यांनी केला. तसेच सपामधून भाजपामध्ये आलेल्या एका नेत्याने कमलेश तिवारी यांची हत्या केली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला.कमलेश तिवारी यांची आई म्हणाली की, पोलिसांनी आणणेल्या दबावामुळे आम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. आम्हाला जोरजबरदस्ती करून लखनौमध्ये आणण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या तपासावर आम्ही समाधानी नाही. मृत्यू झाल्यानंतर हिंदू धर्मात 13 दिवस कुठे जात नाहीत. मात्र आम्हाला जबरदस्तीने सीतापूरहून लखनौला आणले गेले. आता आम्हाला न्याय मिळाला नाही, तर आम्ही हातात तलवार घेऊ.'' असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, कमलेश तिवारींच्या हत्येमागे सपामधून भाजपामध्ये आलेल्या एका नेत्याचा हात असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला. कमलेश तिवारी आणि संबंधित नेत्यामध्ये रामजानकी मंदिराच्या जमिनीवरून वाद सुरू होता, असेही कमलेश तिवारींच्या आईने सांगितले. 

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या घटनेनंतर लखनऊ शहरात प्रचंड तणाव होतो, तसेच बाजारपेठा व दुकानं बंद करण्यात आली होती. कमलेश तिवारी हत्याकांडात उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला अटक केली आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसनं या प्रकरणात सूरतमधून सहा संशयितांना ताब्यात घेतलं. कमलेश तिवारी हत्या प्रकरणात बिजनोरच्या दोन मौलानांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर हत्येचा कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आलाय. मौलाना मुफ्ती नईम काजमी, इमाम मौलाना अनवारुल हक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून, 2015ला या दोन्ही मौलानांनी कमलेशला ठार करणाऱ्याला 1.5 कोटींचं बक्षीस देणार असल्याचं सांगितलं होतं. कमलेश तिवारी यांची पत्नी किरन यांनी नाका हिंडोला पोलीस स्टेशनमध्ये या दोघांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश