कमला बेनीवाल यांची मिझोरमच्या राज्यपालपदावरून हकालपट्टी
By Admin | Updated: August 7, 2014 13:42 IST2014-08-07T10:41:22+5:302014-08-07T13:42:01+5:30
मिझोरमच्या राज्यपाल कमला बेनीवाल यांना पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

कमला बेनीवाल यांची मिझोरमच्या राज्यपालपदावरून हकालपट्टी
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ७ - मिझोरमच्या राज्यपाल कमला बेनीवाल यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी अवघे दोन महिनेच बाकी होते, मात्र त्यापूर्वीच त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनातून बुधवारी रात्री बेनिवाल यांना बडतर्फ करण्याचा निर्णय प्रसिद्ध करण्यात आला.
गेल्या महिन्यातच बेनीवाल यांची गुजरातच्या राज्यपाल पदावरून बदली करून मिझोरामच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याचा राज्यपालपदाचा कार्यकाळ दोन महिन्यांनी संपणार होता, मात्र त्यापूर्वीच त्यांना पदावरून हटविण्यात आले. पुढील सूचना मिळेपर्यंत मणिपूरचे राज्यपाल व्ही. के. दुग्गल हे मिझोरमचे राज्यपाल म्हणून काम पाहतील. बेनीवाल या गुजरातच्या राज्यपाल असताना त्यांचा व गुजरातचे माजी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे मतभेद झाले होते.
दरम्यान बेनीवाल यांच्यावरील कारवाईचा विरोधी पक्षांनी निषेध केला असून सूडभावनेतून ही कारवाई करण्यात अाल्याची टीकाही करण्यात आली आहे. मात्र भाजपने या कारवाईचे समर्थन केले असून संविधानातील तरतुदींनुसारच बेनीवाल यांच्यावर कारवाी करण्यात आल्याचे सांगत ही कारवाई म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन नसल्याचे संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले आहे.