कामठी... तंटामुक्ती
By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:37+5:302014-12-28T23:40:37+5:30
राखडे यांना तंटामुक्त गाव मोहिमेचा पुरस्कार प्रदान

कामठी... तंटामुक्ती
र खडे यांना तंटामुक्त गाव मोहिमेचा पुरस्कार प्रदानकामठी : राज्य शासनाच्या गृहविभागातर्फे सन २००७ मध्ये सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम योजनेची ग्रामीण भागात योग्य अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रबोधनात्मक लिखाण करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कृत केल्या जाते. सन २०१३-१४ या वर्षाचा नागपूर जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार कामठी येथील लोकमतचे तालुका प्रतिनिधी सुदाम राखडे यांना जाहीर झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते त्यांना २५ हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कामठी येथे आयोजित कार्यक्रमात सदर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, ठाणेदार सतीश गोवेकर, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, अजय कामळे, किरण पावसे, पोलीस उपनिरीक्षक श्वेता मिश्रा, दिलीप वानखेडे, भोजराज बांते, देवीदास बांगळे, रमेश चहारे, माधुरी हातमोडे आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालन त्रिवेणी चौधरी यांनी तर आभार प्रीती खोब्रागडे यांनी मानले. राखडे यांच्या गौरवाबद्दल जिल्ह्यातील अनेक पत्रकार, तालुका पत्रकार संघ आदी सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. (तालुका प्रतिनिधी)