कामठी... विज्ञान प्रदर्शन

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:42+5:302014-12-18T00:40:42+5:30

विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी

Kamathi ... science demonstration | कामठी... विज्ञान प्रदर्शन

कामठी... विज्ञान प्रदर्शन

द्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी
अनिता चिकटे : कामठी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
कामठी : विज्ञान हे सर्व विषयाची गुरुकिल्ली आहे. विज्ञानामुळे संपूर्ण विश्व एकत्रित होत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान सामावलेले आहे. तेव्हा ग्रामीण व दुर्मिळ भागातील विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी, असे मत पंचायत समितीच्या सभापती अनिता चिकटे यांनी व्यक्त केले.
स्थानिक सेंट जोसेफ कॉन्व्हेंट व पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपसभापती देवेंद्र गवते होते. याप्रसंगी खंडविकास अधिकारी अरुण निंबाळकर, गटशिक्षणाधिकारी गोपाल कुनघटकर, पोषण आहार अधीक्षक बादल तोतोडे, गटसमन्वयक प्रशांत मेश्राम, केंद्र प्रमुख आनंद पाहुणे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनात विविध शाळांतील प्राथमिक गट ७०, माध्यमिक गट २७, माध्यमिक शिक्षक गटात तीन, प्राथमिक शिक्षक गटात १०, प्रयोगशाळा परिचर तीन व लोकसंख्या शिक्षण पाच अशा एकूण १२६ प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. प्रसंगी पाहुण्यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. संचालन रत्नमाला कहीलकर यांनी तर आभार कश्यप सावरकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Kamathi ... science demonstration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.