कामठी... कौमी एकता

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:02+5:302014-12-25T22:41:02+5:30

यंग मुस्लिम क्लबला विजेतेपद

Kamathi ... Quami Ekta | कामठी... कौमी एकता

कामठी... कौमी एकता

ग मुस्लिम क्लबला विजेतेपद
ग्रामीण पोलिसांचे आयोजन : कौमी एकता फुटबॉल स्पर्धेची सांगता
कामठी : नागपूर जिल्हा ग्रामीण पोलिसांच्यावतीने स्थानिक पोरवाल महाविद्यालयाच्या प्रांगणात कौमी एकता फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बक्षीस वितरण या स्पर्धेची सांगता झाली. फुटबॉल स्पर्धेत नागपूरच्या यंग मुस्लिम क्लबने विजेतेपद पटाकावले. सदर संघाने स्पर्धेतील अंतिम सामन्यात नागपूर फुटबॉल ॲकेडमी संघाचा २-० गोलने पराभव केला.
कौमी एकता फुटबॉल स्पर्धेचे पुरस्कार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी पोरवाल शिक्षण संस्थेचे सचिव विजय शर्मा, डॉ. एस. एन. घोषाल, प्राचार्य डॉ. एस. एस. धोगडे, अफाज अहमद, भंते धम्मानंद, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, नवनाथ ढवळे, मंगेश चव्हाण यांची उपस्थिती होती. प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या यंग मुस्लिम संघास ५१ हजार रुपये रोख व फिरते चषक तर उपविजेत्या नागपूर फुटबॉल ॲकेडमी संघास २१ हजार रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार इमरान खान, बेस्ट हॉफ राहुल नेवारे, उत्कृष्ट गोलरक्षक अब्दुल अन्सारी, मॅन ऑफ सिरीज रशीद अन्सारी, बेस्ट डिफेन्डर फजूल हुसेन यांना गौरविण्यात आले. यावेळी स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्यांचा पाहुण्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ठाणेदार सतीश गोवेकर यांनी केले. संचालन विशाल पाटील यांनी तर आभार कन्हानचे ठाणेदार माकोडे यांनी मानले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अजय कामळे, किरण पावसे, पोलीस उपनिरीक्षक श्वेता मिश्रा, दिलीप वानखेडे, भोजराज बांते, समाधान पांढरे, रमेश चहारे, देवीदास बांगळे, त्रिवेणी चौधरी, अर्पणा साळवे, प्रीती खोब्रागडे, माधुरी हातमोडे, प्रदीप गुजर, अशोक वासनिक, मकेश्वर, राजू राऊत, काझी, बंड आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Kamathi ... Quami Ekta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.