कामठी....

By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:08+5:302015-02-13T00:38:08+5:30

वाहतूक सिग्नल बनल्या शोभेच्या वस्तू

Kamathi .... | कामठी....

कामठी....

हतूक सिग्नल बनल्या शोभेच्या वस्तू
कामठीतील प्रकार : रहदारीला अडसर, अपघातांचे प्रमाण वाढले
कामठी : शहरातील कळमना टी पॉईंट चौक, जयस्तंभ चौक व ड्रॅगन पॅलेस टेम्पल भुयारी मार्गावरील अतिशय वर्दळीच्या चौकातील वाहतूक सिग्नल सतत बंद राहात असल्याने हे वाहतूक सिग्नल शोभेच्या वस्तू ठरत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कळमना टी पॉईंट चौक, जयस्तंभ चौक, ड्रॅगन पॅलेस परिसरातील भुयारी मार्ग चौकात नेहमी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या सर्व चौकांतील वाहतूक सिग्नल सतत बंद राहतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. शिवाय, वाहतूक विस्कळीत होत असल्याने अपघाताचेही प्रमाण वाढले आहे.
राज्य शासनाने निधी उपलब्ध करून देत वर्षभरापूर्वी शहरातील चौकात वाहतूक सिग्नल लावण्यात आले. परंतु, या वाहतूक सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने ते नेहमी बंद अवस्थेत असतात. परिणामी अनेक दुचाकी, चारचाकी वाहनचालक सरार्स वाहतूक नियमांचे उलंघन करीत मार्ग काढतात. त्यामुळे अतिशय वर्दळीच्या या चौकात अपघात घडत आहेत.
या सर्व चौकामध्ये वाहतूक पोलीस कर्तव्यावर राहत नसल्याने वाहनचालक नियम धाब्यावर ठेवतात. त्यामुळे या वाहतूक सिग्नलची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे. शिवाय पोलीस विभागाने सर्व चौकात वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Kamathi ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.