कामठी....

By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:09+5:302014-12-20T22:28:09+5:30

वित्तमंत्र्यांची ड्रॅगन पॅलेसला भेट

Kamathi .... | कामठी....

कामठी....

त्तमंत्र्यांची ड्रॅगन पॅलेसला भेट
कामठी : शांतीशिल्प ड्रॅगन पॅलेस टेम्पल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्राला राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी शनिवारी सदिच्छा भेट दिली. प्रसंगी माजी राज्यमंत्री व ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख ॲड. सुलेखा कुंभारे यांनी त्यांचे स्वागत केले. प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गौतम बुद्धांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले तसेच बुद्धवंदना घेण्यात आली. मनाला पवित्र व प्रसन्न करणारे हे स्थान असून समाजाला जगण्याचा नि:शब्द मंत्र देणारे ड्रॅगन पॅलेस आहे. येथे भेट दिल्याने आनंद झाला, असे भावोद्गार ना. मुनगंटीवार यांनी प्रसंगी काढले. यावेळी नगराध्यक्ष रिजवाना कुरेशी, उपाध्यक्ष रणजित सफेलकर, अजय कदम, नुसरत कमाल अन्सारी, तिलक गजभिये, सुभाष सोमकुवर, मोरेश्वर पाटील, देवचंद डांगे, कपिल गायधने, रतन वासनिक, अश्पाक कुरेशी, दीपक सिरीया, सुधीर डोंगरे, नारायण नितनवरे, अविनाश उकेश, मुस्ताक ठेकेदार, गजानन भावे, मोतीलाल मेश्राम, गणेश सेंगर, संजय सुके, अजमल अन्सारी, त्रिशरण खोब्रागडे, राजेश गजभिये, दीपक डांगे, प्रवीण नगरकर, सुशील तायडे, राजेश शंभरकर, सुनील वानखेडे, सुकेशनी मुरारकर, कापसे, जांभुळकर, मानकर, शालू सावतकर, सुमन घरडे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Kamathi ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.