शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 06:15 IST

बैठकांच्या सत्रांनंतर अखेर काँग्रेस नेतृत्त्वाकडून अनुभवाला प्राधान्य

भोपाळ: काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून कमलनाथ यांच्यासोबतच ज्योतिरादित्य सिंधिया यांचं नाव चर्चेत होतं. मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. काँग्रेसनं ट्विट करुन कमलनाथ यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कमलनाथ यांच्या शपथविधीची तारीख आज जाहीर केली जाणार आहे.मध्य प्रदेशात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यापासून मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरू झाली होती. यानंतर बैठकांचं सत्र सुरू झालं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या. यानंतर मध्य प्रदेशच्या नवनिर्वाचित आमदारांचीही बैठक झाली. अखेर कमलनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. ते राज्याचे 18 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मंगळवारी मध्य प्रदेशसह पाच राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर झाले. यात काँग्रेस मध्य प्रदेशातील सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसला बहुमतासाठी अवघ्या दोन जागा कमी पडल्या. मात्र त्यांना बसपानं पाठिंबा जाहीर झाला. तेव्हापासून मुख्यमंत्री निवडण्यासाठी काँग्रेसमध्ये बैठकांचं सत्र सुरू होतं. सर्वात आधी भोपाळमध्ये पर्यवेक्षकांची बैठक झाली. यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया आणि कमलनाथ या दोन प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं. मुख्यमंत्री कोण होणार, याची घोषणा भोपाळमध्येच होईल, अशी माहिती बैठकीतून बाहेर पडताना दोन्ही नेत्यांनी दिली. दोन्ही नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राहुल यांनी त्यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट केला. यानंतर राहुल यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा नेमकी कोणाकडे सोपवली जाणार, याबद्दलचे संकेत दिले. या फोटोत राहुल दोघांच्या मध्ये उभे आहेत. त्यांनी दोघांचा हात धरला आहे. 'वेळ आणि संयम हे दोन सर्वात मोठे योद्धे आहेत,' हे लियो टॉलस्टॉय यांचं वाक्य त्यांना या फोटोसोबत वापरलं होतं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेस