शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

उद्या दुपारी 12 वाजता अभिनेते कमल हासन करणार मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 18:53 IST

कमल हासन यांनी हिंदू दहशतवादासंबंधी केलेल्या विधानावरुन ते सध्या भाजपाच्या निशाण्यावर आहेत.

ठळक मुद्देअभिनेता कमल हासन आणि त्यांच्यासारख्या लोकांची गोळ्या घालून हत्या केली पाहिजे. हिंदू धर्मासाठी अपमानास्पद भाषा वापरणा-यांना जगण्याचा कोणताच हक्क नाही.

चेन्नई - अभिनयाकडून राजकीय प्रवेशाच्या वाटेवर असललेले कमल हासन उद्या मंगळवारी दुपारी 12 वाजता मोठी घोषणा करणार आहेत. कमल हासन नेमका काय निर्णय जाहीर करणार याविषयी कमालीची उत्सुक्ता आहे. मागच्या काही दिवसांपासून कमल हासन सातत्याने राजकीय विधाने करत आहेत. त्यामुळे ते दुस-या कुठल्या पक्षात जाणार कि, स्वत:चा राजकीय पक्ष काढणार ते उद्याच स्पष्ट होईल. सीएनएन न्यूज 18 ने कमल हासन उद्या दुपारी घोषणा करणार असल्याचे वृत्त दिले आहे. 

कमल हासन यांनी हिंदू दहशतवादासंबंधी केलेल्या विधानावरुन ते सध्या भाजपाच्या निशाण्यावर आहेत. उजव्या विचारसरणीच्या लोकांनी भारतात हिंदू दहशतवादी असल्याचे नाकारु नये. उजव्या विचारसरणीच्या लोकांनी कोणालाही आव्हान देऊ नये. त्यांच्यामध्ये हिंदू दहशतवादी आहेत. हा दहशतवाद पसरला असून त्यांना त्याचा काहीही उपयोग होणार नाही असे  कमल हासन यांनी एका तामिळ साप्ताहिकात लिहिलेल्या लेखात म्हटले होते. त्यांचा हा लेख विधान भाजपा नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. 

कमल हासन यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली पाहिजे. त्यांची मनोवस्था ठीक नसून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्याची गरज आहे असे भाजपा नेते विनय कटियार म्हणाले. अशा प्रकारचे एखाद्याची बदनामी करणारे राजकारण करणे अजिबात योग्य नाही. त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाहीय असे कटियार यांनी सांगितले. 

कमल हासनला गोळ्या घातल्या पाहिजेतअभिनेता कमल हासन आणि त्यांच्यासारख्या लोकांची गोळ्या घालून हत्या केली पाहिजे असं अखिल भारतीय हिंदू महासभेने म्हटलं होतं. 'कमल हासन आणि त्यांच्यासारख्यांना धडा शिकवण्यासाठी एकतर गोळ्या घालून हत्या केली पाहिजे, किंवा फासावर लटकवलं पाहिजे. हिंदू धर्मासाठी अपमानास्पद भाषा वापरणा-यांना जगण्याचा कोणताच हक्क नाही. असं अपमान कोणी करत असेल तर त्याला जगण्याचा अधिकार नाही', असं अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक शर्मा बोलले. 

हिंदू महासभेच्या दुस-या एका नेत्याने कमल हासन यांच्या सर्व चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. 'आमच्या सर्व सदस्यांनी कमल हासन आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित सर्व चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची शपथ घेतली आहे. सर्व भारतीयांनीही हा निर्णय घेतला पाहिजे. हिंदूंचा आणि धर्माचा अपमान करणा-यांना माफ करता कामा नये', असं मेरठचे अध्यक्ष अभिषेक अग्रवाल बोलले. 

टॅग्स :Kamal Hassanकमल हासन