शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कमल हसन व रजनीकांत एकत्र?, तामिळनाडूमध्ये नव्या वर्षात होणार विधानसभा निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 07:13 IST

Kamal Haasan and Rajinikanth : रजनीकांत हे पुढील वर्षी राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. कमल हासन यांनी त्यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. रजनीकांत यांच्या पक्षाची विचारधारा जुळल्यास युती करण्यास हसन यांची तयारी आहे.

 चेन्नई : तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी मे महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे हे दोन दिग्गज एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.रजनीकांत हे पुढील वर्षी राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. कमल हासन यांनी त्यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. रजनीकांत यांच्या पक्षाची विचारधारा जुळल्यास युती करण्यास हसन यांची तयारी आहे. ते म्हणाले, की, माझ्याप्रमाणेच तेदेखील बदलासाठी लढत आहेत. रजनीकांत यांनी पक्षाबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. आम्ही फक्त एका फोनकॉलच्या अंतरावर आहोत. एकत्र काम करणे शक्य असल्यास आम्ही त्याबाबत निश्चितच विचार करू. परंतु, या दोन अभिनेत्यांनी एकत्र येण्याचा विचार रजनीकांत यांच्या चाहत्यांना  रुचलेला नाही. रजनीकांत फॅन असोसिएशनने यास विरोध केला आहे. 

भाजपला फायदा होण्याची शक्यताकमल हसन यांनी ‘मक्कल नीधी मैयम’ नावाने पक्ष स्थापन केला आहे. लोकसभेत पक्षाला ३.७७ टक्के मते मिळाली होती. ते सध्या निवडणुकीत एकटेच लढणार आहेत. त्यामुळे त्यांना भाजपची ‘बी’ टीम असल्याचे बोलले जात आहे. हसन हे ‘डीएमके’ आण‍ि ‘एआयएडीएमके’ या पक्षांची मते ओढू शकतात. परिणामी भाजपलाच फायदा होण्याची शक्यता जास्त आहे.

टॅग्स :Kamal Hassanकमल हासनChennaiचेन्नई