पावसाळयापर्यंत पाणी कपातीचे संकट नाही कल्याण-डोंबिवली : पुर्ण संकट टळलेले नाही

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:22+5:302015-09-01T21:38:22+5:30

अनिकेत घमंडी

Kalyan-Dombivli: The whole crisis is not halted | पावसाळयापर्यंत पाणी कपातीचे संकट नाही कल्याण-डोंबिवली : पुर्ण संकट टळलेले नाही

पावसाळयापर्यंत पाणी कपातीचे संकट नाही कल्याण-डोंबिवली : पुर्ण संकट टळलेले नाही

िकेत घमंडी
डोंबिवली : सुमारे १६ लाख कल्याण-डोंबिवलीकरांवर पावसाळा पूर्ण होईस्तोवर पाणी कपातीचे संकट ओढावणार नसल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. परंतु, त्यानंतर मात्र जलसिंचन विभागाने निर्णय घेतल्यास गतवर्षीपेक्षाही जास्त पाणी कपात होणार आहे.
महापालिका हद्दीत सध्या २७ गावे धरुन दिवसाला सुमारे ३५० दशलक्ष लिटर पाणी वितरीत केले जाते. त्या गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. ती वगळता महापालिकेकडून सुमारे ३०५-१० एमएलडी पाणी वितरीत केले जाते. या ठिकाणी पाणीपुरवठा करणार्‍या आंध्र आणि बारवी या दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठा खालावलेला असून एका ठिकाणी अवघा ३५/४० टक्के तर दुसर्‍या ठिकाणी केवळ ५६ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचीही माहिती मिळाली.
महापालिका हद्दीत सुमारे ६५ हून अधिक जलकुंभांमधून पाणीपुरवठा केला जातो. तसेच सुमारे ७० हजारांहून अधिक पाणी मीटर असल्याची माहिती विभागाकडून मिळाली. एकूण पाण्यापैकी सुमारे १५० एमएलडी पाणी उल्हास नदीच्या पात्रातून, ९०-९५ दशलक्ष लिटर पाणी एमआयडीसी देते. तर अन्य ७ दशलक्ष लिटर पाणी टिटवाळ्याच्या माध्यमातून मिळते. एमआयडीसी स्वत: पाणी शुद्ध करुन देते. तसेच उल्हास नदिचे पाणी व टिटवाळळ्याचे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी बारवे जलशूद्धीकरण केंद्राचा वापर करण्यात येत असून त्या ठिकाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया होते. त्यानंतर पाण्याचे वितरण केले जाते. वितरणाचे आणखी काही नवीन जलकुंभ बांधले असून त्यातूनही पाणी वितरीत करण्याबाबतची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पाणी गळतीला चाप लावून त्या ठिकाणी आगामी काळात हजारो मीटर लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
...............................................................................
कोट : जोपर्यंत रेनफॉल आहे तोपर्यंत पाणी कपात नाही, परंतू त्यानंतर मात्र इरिगेशन विभागाच्या सूचनांनुसार पाणी कपात करण्यात येणार - तरूण जुनेजा, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, केडीएमसी

Web Title: Kalyan-Dombivli: The whole crisis is not halted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.